One injured in firing in Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा एमआयडीसीतील हॉटेल द पाम्सच्या पार्किंगमध्ये गाडीसमोर लघुशंका केल्याच्या वादानंतर प्लॉटिंग व्यावसायिकावर अवघ्या अर्धा किमी अंतरावर जीवघेणा हल्ला झाला. रविवारी (दि. २१) मध्यरात्री सव्वाबारा ते साडेबारा वाजेदरम्यान फिजिक्सवाला समोर दुचाकीवर आलेल्या तिघांनी व्यावसायिकाच्या गाडीवर थेट पिस्तूल रोखून गोळी झाडली. ती गोळी कानाज-वळून जात काचेला लागली. सुदैवाने प्रसंगावधानाने गाडी दामटल्याने दोघेही थोडक्यात बचावले.
फिर्यादी तौफिक शेफिक पठाण (३०, रा. कमळापूर, एमआयडीसी वाळूज) यांच्या तक्रारीनुसार, ते प्लॉटिंग व्यावसायिक आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते त्यांच्या फोर्ड एन्डेव्हर (एमएच-२०-एफसी-७०००) गाडीने तर त्यांचा मित्र निसार जबार खान (रा. मिसारवाडी) हे स्कोडा ऑक्टव्हर कारने (एमएच-२० डीजी-०४५०) दोघे चिकलठाणा येथील द पाम्स हॉटेलमध्य जेवण करण्यासाठी गेले. जेवण झाल्यानंतर रात्री सव्वाबाराच्या सुमारास दोघेही पार्किंगमधील आले. तेव्हा हॉटेलमधून गणेश औताडे नावाचा एक जण दारूच्या नशेत बाहेर आला. तो अचानक शिवीगाळ करत असल्याने झाली. औताडेच्या सोबतच्याने माफी मागितल्याने प्रकरण मिटले. त्याचवेळी त्याने फोनवर कोणालातरी वाद झाल्याचे सांगितले. पठाण आणि खान दोघे दहा मिनिटे तेथे थांबून आपापल्या वाहनाने कलाग्राममार्गे निघाले.
साडेबाराच्या सुमारास फिजिक्सवाला समोर खान यांनी त्यांची गाडी थांबून लघुशंकेला खाली उतरले. त्यामुळे पठाण यांनीही गाडी थांबविली. डाव्या बाजूची काच खाली करून खान सोबत बोलू लागले.
पठाण यांचा मित्र खान यांनी त्यांची कार तेथेच सोडून एकाच गाडीमधून निघून गेल्यानंतर आरोपींनी खान यांच्या कारची काच फोड्न नासधूस केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलिस निरीक्षक भरत पाचोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुलेटची खाली केस जप्त करण्यात आली. फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.
एपीआय कॉर्नरकडून मोपेडवर तीन जण आले. एकाने रुक रुक म्हणत पळत येत पिस्तूल काढले. खान यांनी त्यांना पाहून गाडी निकाल, असे ओरडून पठाणच्या गाडीमध्ये शिरले. तेवढ्यात पिस्तूलघारी आरोपीने गाडीजवळ येऊन खिडकीतून आत गोळी झाडली. ती खान यांच्या कानाजवळून जाऊन चालक सीटवर बसलेल्या पठाण यांच्या बाजूच्या बंद काचेवर लागली. मागे सरकल्याने दोघेही बचावले, पठाण यांनी घाबरून गाडी काढून थेट एमआयडीसी बाळूज पोलिस ठाणे गाठले. तेथून परत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून जिवे मारण्याचा प्रयत्न व अन्य कलमाखाली गुन्हा दाखल झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौफेर बाजूने तपास केला जात आहे. औताडे पोलिसांच्या रेकॉर्डवरील असल्याने त्याच्यावरच पोलिसांना संशय आहे. दरम्यान, घटनेनंतर औताडे आणि अन्य मोबाईल बंद करून पसार झाले आहेत. त्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.