Sambhajinagar Crime : एम्स हॉस्पिटलमध्ये नर्सचा संशयास्पद मृत्यू

सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
AIIMS Hospital
एम्स हॉस्पिटलमध्ये नर्सचा संशयास्पद मृत्यू File Photo
Published on
Updated on

Nurse dies suspiciously at AIIMS Hospital

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : टीव्हीसेंटर भागातील एम्स हॉस्पिटलमधील नर्सचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (दि.२१) दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

AIIMS Hospital
मराठवाड्याला अतिरिक्त ८० टीएमसी पाणी देण्यासाठी ७० हजार कोटींचा प्रकल्प

हर्षदा पद्माकर तायडे (२५, रा. मिसारवाडी) असे मृत नर्सचे नाव असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा ही मागील तीन महिन्यांपासून टीव्हीसेंटर भागातील एम्स हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. ती अतिशय हुशार होती. ऑपरेशन थियेटरमध्ये तिची ड्यूटी असायची.

रविवारी सकाळी ती नऊ वाजता हॉस्पिटलमध्ये ड्यूटीसाठी आली होती. दुपारी चारच्या सुमारास ती हॉस्पिटलमधील सहकाऱ्यांना न सांगता गेली. परंतु बराच वेळ झाला तरी परत न आल्याने सहकार्यांनी तिला फोन केला. तेव्हा तिने वॉशरूममध्ये असल्याचे सांगितले. दरम्यान, तिचा फोन बराच वेळ व्यस्त येत होता. ती परत येत नसल्याने सहकाऱ्यांनी जाऊन बाथरूममध्ये पाहिले असता दरवाजा आतून लावलेला होता. बराच वेळ दरवाजा वाजवूनही उघडत नसल्याने दरवाजा उघडून पाहिले असता आत हर्षदा बेशुद्धावस्थेत आढळून आली. आत एक इंजेक्शन दिसून आले. तिला तात्काळ उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निवृत्ती गायके, सहायक फौजदार राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

AIIMS Hospital
lumpy disease : सुलतानपूर परिसरात लम्पीचा प्रकोप, दीडशेहून अधिक जनावरे बाधित

मृत्यूचे कारण अस्पष्ट

पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षदा बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्या बाथरूममध्ये सिरीन, इंजेक्शन सापडले. तिने हायर डोस घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी बाथरूम सील केले आहे. मात्र तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अर्ध्या तासात संपणार होती ड्यूटी

हर्षदा ऑपरेशन थियेटरमध्ये (ओटी) काम करायची. रविवार असल्याने ओटी बंद होती. त्यामुळे सकाळपासून हर्षदा पेपर अपडेट करत होती. तिची चार वाजता ड्यूटी संपत असते. मात्र आज सकाळी ती ९ वाजता आल्याने पाच वाजता जाणार होती. मात्र तत्पूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. तिच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहिण असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घातपात झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

हर्षदाच्या हातात इंजेक्शनचा व्रण आहे. ऑपरेशनसाठी आवश्यक औषधीच दिले जातात. त्यामुळे हर्षदाकडे इंजेक्शन आले कोठून? तिला घरी कुठलाही तनाव नव्हता. भावाने साडेचारच्या सुमारास तिला फोन केल्यावर हॉस्पिटलमधील एकाने उचलून तिच्या डोक्याला मार लागल्याची माहिती दिली. त्यामुळे भावाने धाव घेऊन पाहिले तेव्हा हा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे यात घातपात असल्याचा संशय तिच्या भावाने व्यक्त केला आहे. सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news