Mahavitaran News : कन्नड तालुक्यात दीड हजार घरगुती वीज कनेक्शन कट File Photo
छत्रपती संभाजीनगर

Mahavitaran News : कन्नड तालुक्यात दीड हजार घरगुती वीज कनेक्शन कट

१४ हजार ग्राहकांकडे ४ कोटी ९३ लाखांची थकबाकी

पुढारी वृत्तसेवा

One and a half thousand domestic electricity connections cut in Kannada taluka

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्याने महावितरणकडून थकबाकी वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. थकीत वीज बिल न भरलेल्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करत आतापर्यंत तालुक्यातील सुमारे दीड हजार घरगुती वीज कनेक्शन तात्पुरते बंद (कट) करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या कन्नड विभागाकडून देण्यात आली आहे.

तालुक्यातील अनेक ग्राहकांकडून दीर्घकाळापासून वीज बिलाची थकबाकी प्रलंबित असल्याने महावितरणसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी गावोगावी जाऊन ग्राहकनिहाय भेटी देत आहेत. ग्राहकांना थकबाकी भरण्याबाबत सूचना देणे, समजावणे तसेच आवश्यक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार कन्नड विभागातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक अशा एकूण १४ हजार ४८३ ग्राहकांकडे ४ कोटी ९३ लाख ४६ हजारांची थकबाकी प्रलंबित आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणकडून वसुलीची मोहीम आणखी वेगाने राबविण्यात येत आहे.

यामध्ये घरगुती ग्राहकांबरोबरच दुकाने, छोटे उद्योग, व्यावसायिक आस्थापना तसेच औद्योगिक ग्राहकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे समोर आले आहे. अनेक वेळा सूचना देऊनही काही ग्राहकांकडून वीज बिल न भरल्याने अखेर वीज कनेक्शन कट करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, थकबाकीदार ग्राहकांनी लवकरात लवकर आपली थकबाकी भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काळात आणखी कडक कारवाई करण्यात येणार असून, थकीत बिल असलेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

थकबाकी वसुली मोहिमेला गती

अजूनही मोठ्या प्रमाणात थकबाकी शिल्लक असल्याने महावितरणची मोहीम पुढील काही दिवस अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तालुक्यातील नागरिकांनी वीज बिल वेळेवर भरून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता रमेश वाघचौरे यांच्याकडून करण्यात आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT