Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Corporator Disqualification Case : नगरसेवक अपात्रता प्रकरणाच्या पुढील सुनावणी लवकरच

मनपा आयुक्तांची माहिती : ३८ पैकी २७ तक्रारींवर सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

Next hearing in the corporator disqualification case soon

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नगरसेवक अपात्रता प्रकरणातील सुनावणीदरम्यान तक्रारदारांकडून नवे मुद्दे व पुरावे मांडले जात असल्याने संबंधित नगरसेवकांना म्हणणे मांडण्यासाठी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी वेळ वाढवून दिला आहे. पुढील सुनावणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून, येत्या दोन-तीन दिवसांत त्या संबंधित नगरसेवक व तक्रारदारांना कळविण्यात येतील, अशी माहिती आयुक्तांनी मंगळवारी (दि. ८) दिली.

महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ११५ पैकी २५ नगरसेवकांविरोधात दोनपेक्षा अधिक अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ३८ तक्रारी दाखल आहेत. यामध्ये एमआयएमचे १८, भाजपचे सहा आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

आयुक्त येडगे यांनी १७ व २४ ऑगस्ट तसेच ७ सप्टेंबर रोजी सुनावणी घेत ३८ पैकी २७ तक्रारींवर सुनावणी पूर्ण केली आहे. उर्वरित ११ तक्रारींवर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी प्रस्तावित आहे. मात्र, नव्याने मांडण्यात आलेले मुद्दे व पुराव्यांचा अभ्यास करून उत्तर देण्यासाठी नगरसेवकांनी वेळ मागितला. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

प्रत्येकाला संधी मिळणे आवश्यक तक्रारदारांकडून प्रत्येक उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे संबंधित प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. पुढील सुनावणीच्या तारखा निश्चित असून, दोन-तीन दिवसांत त्या संबंधितांना कळविण्यात येतील.
अमोल येडगे, महापालिका आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT