मार्चअखेर आरटीओची नवी इमारत नागरिकांच्या सेवेत file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मार्चअखेर आरटीओची नवी इमारत नागरिकांच्या सेवेत

स्थलांतराचा मुहूर्त अद्यापही ठरला नाही; प्रशासनाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

New RTO building to be put into service by citizens by the end of March

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : साजापूर-करोडी परिसरात आरटीओ कार्यालयाची पाच मजली टोलेजंग इमारतीचे व इतर काम पूर्ण झाले आहे. परिसरातील कॅन्टीनचे काम अंतिम टप्प्यात असून, मार्च अखेरपर्यंत ही इमारत पूर्णपणे सज्ज होणार आहे. दरम्यान, कार्यायालचे स्थलांतर कधी होईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

करोडी परिसरात आरटीओ कार्यालयाची सर्व सोयीसुविधांयुक्त इमारत ३७ कोटी १५ लाख करून खर्च करून उभारण्यात आली आहे. या इमारतीत अत्याधुनिक वाहन परिक्षण व निरीक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच अधिकया प्रमाणच वाहनधारकांसाठीही येथे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

यात वाहनतळ, स्वच्छतागृह, वेटिंग हॉल, कन्टीन आदी सुविधा आहेत. यात इमारतीसह सर्वच कामे पूर्ण झाली असून, केवळ कॅन्टीनचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, नवी इमारत कामकाजासाठी पूर्णपणे सज्ज राहणार आहे.

इमारत पूर्णपणे सज्ज राहणार असली तरी नव्या इमारतीतून कारभार कधी सुरू होईल, याचा निर्णय अद्याप झाला नाही. याबाबत वरिष्ठांच्या सूचनेनंतरच नव्या इमारतीतून कारभार सुरू होणार असल्याची माहिती काठोळे यांनी दिली.

नव्या इमारतीतून चालणार कारभार

नव्या इमारतीतून ट्रान्सपोर्ट, नॉन ट्रान्सपोर्ट तसेच इतर अकॅडमिक कामे चालणार आहेत. जुन्या आरटीओ कार्यालयापासून नवी इमारत सुमारे १० किलोमीटर दूर असल्याने कामानिमित्त गेलेले वाहनधारकांना मात्र पूर्ण दिवस वाया घालावा लागणार आहे. नव्या इमातीतून १ प्रादेशिक परिवहन अधिकारी, २ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ८ मोटर वाहन निरीक्षक, २० सहायक मोटार वाहन निरीक्षक व अकॅडमिक स्टाफ येथून काम करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT