Rangpanchami : रंगांनी भंग नको, होळी खेळताना घ्या काळजी

तज्ज्ञ म्हणतात : त्वचेला खोबऱ्याचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावा
sambhajinagar news
Rangpanchamifile photo
Published on
Updated on

Be careful while playing Rangpanchami

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर: मनसोक्त रंगांची उधळण करत उत्साह आणि आनंदाचा सण म्हणजेच धूलिवंदन. मात्र याच उधळलेल्या किंवा चेहऱ्याला लावलेल्या रंगांमुळे जेव्हा त्वचेचे नुकसान होते, तेव्हा सणाचा आनंद भंग पावतो. त्यामुळे होळी खेळताना कोरडे नैसर्गिक रंग वापरावेत. शरीरावर भरपूर खोबऱ्याचे तेल अथवा मॉइश्चरायझर लावावे. केस मोकळे न सोडता घट्ट बांधावेत आणि स्कार्फ किंवा टोपी घालावी, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.

sambhajinagar news
बनावट नोटा छापण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी नांदेडची टोळी गजाआड

दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्त शहरातील रंगबाजार सजले असून, खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल सुरू आहे. उद्या, मंगळवारी विविध रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी विविध मंडळांसह तरुण आणि नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, घातक रंगांची भीतीही कायम आहे. बाजारात सध्या नॉन टॉक्सिक रंगही उपलब्ध आहेत.

हे रंग पूर्णपणे रसायनमुक्त नसले तरी, पाण्याने सहजरीत्या निघू शकतील अशा घटकांपासून बनवलेले असतात. रासायनिक आणि केमिकल युक्त रंगांचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रंग खेळायला जाताना शक्यतो अंगभर जाड कपडे घालावेत. शरीराच्या उघड्या भागांवर जसे की चेहरा, हात आणि मान यावर भरपूर प्रमाणात खोबऱ्याचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे. ओठांना व नखांच्या बाजूला व्हॅसलीन लावण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

sambhajinagar news
चोरीच्या संशयातून हत्या करणाऱ्या सुरक्षारक्षकासह चौघांना ३ मार्चपर्यंत कोठडी
चमकी, केमिकलयुक्त रंग घातक चमकीचे आणि केमिकलयुक्त रंग अतिशय घातक असतात. अशा रंगांमुळे त्वचेची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे होळी खेळताना शक्यतो नैसर्गिक रंगांचाच वापर करावा. हर्बल व नैसर्गिक रंगांनी होळी खेळण्याचा आनंद द्विगुणित करावा.
डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोग तज्ज्ञ
होळीनंतर त्वचा, केस खराब झाल्याच्या तक्रारी रासायनिक रंग त्वचा आणि केसांसाठी अतिशय धोकादायक असतात. दरवर्षी होळीनंतर त्वचा आणि केस खराब झाल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढते. त्यामुळे रंग खेळताना त्वचा आणि केसांची विशेष काळजी घ्यावी.
डॉ. आसावरी टाकळकर, त्वचारोग तज्ज्ञ

त्वचेला मायक्रोइंज्युरीचा धोका

चमकीच्या आणि केमिकल रंगांमुळे त्वचेची आग होते, पुरळ येतात आणि त्वचेचे गंभीर आजार उद्भवू शकतात. चमकीच्या रंगांमध्ये मायका व फाईन ग्लास पावडरचा वापर केला जातो. हे रंग लावल्यास त्वचेला अतिसूक्ष्म मायक्रोइंज्युरी पोहोचते. चमकीच्या रंगांचा वापर टाळावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news