चोरीच्या संशयातून हत्या करणाऱ्या सुरक्षारक्षकासह चौघांना ३ मार्चपर्यंत कोठडी

हमालवाडा औद्योगिक परिसरातील पाईप कंपनीत वायर चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Jail
चोरीच्या संशयातून हत्या करणाऱ्या सुरक्षारक्षकासह चौघांना ३ मार्चपर्यंत कोठडीfile photo
Published on
Updated on

Four people, including security guard, who killed on suspicion of theft, remanded in custody till March 3

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हमालवाडा औद्योगिक परिसरातील पाईप कंपनीत वायर चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला संशयास्पद मृत्यू मानल्या गेलेल्या या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत हा खून असल्याचे स्पष्ट केले. कंपनीचा सुरक्षारक्षक आणि त्याच्या तिघा मित्रांना अटक करण्यात आली असून, त्यांना तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स्नेहल जाधव यांनी दिले.

Jail
एमआयएमच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सुरक्षारक्षक राहुल बाबूराव दुतोंडे (२४), ऋषिकेश बबन वक्ते (२५), रोहित संतोष नगराळे (१९) आणि चंद्रकांत भाऊसाहेब मारकळ (२१, सर्व रा. खंडोबा मंदिर, सातारा गाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

१८ फेब्रुवारीच्या रात्री हमालवाडा येथील मराठवाडा स्पन पाईप कंपनीच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात शरीरावर अनेक ठिकाणी सूज व गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्याने बोथट वस्तूने प्रहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासाची दिशा खुनाकडे वळवण्यात आली.

Jail
बनावट नोटा छापण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी नांदेडची टोळी गजाआड

घटनास्थळी त्या रात्री उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाची चौकशी केली असता सुरुवातीला विसंगत माहिती देण्यात आली. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत वायर चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याची कबुली आरोपींनी दिली.

घटनेच्या वेळी सुरक्षारक्षक दुतोंडे हा ड्यूटीवर होता. त्याचे मित्र कंपनीत आले होते. चौघांनी आवारातच मद्यपान केले. त्याचदरम्यान एक अनोळखी व्यक्ती वायर चोरण्याच्या उद्देशाने आत शिरल्याचा संशय आल्याने त्यांनी त्याला पकडले.

नशेत असलेल्या आरोपींनी संबंधितास दोरीने खुर्चीला बांधून बेदम मारहाण केली. गंभीर जखमांमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी तेथून पळ काढल्याची माहिती तपासात पुढे आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही कारवाई निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक निरीक्षक शैलेश देशमुख, उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, हवालदार दिगंबर राठोड, सुनील पवार, सुनील बेलकर, संदीप चिंचोले, सचिन काळे, दिनेश भुरेवाल, सुरेश काळे, सुभाष पाचे, कल्याण निकम आदींनी केली.

आरोपींना तीन दिवसांची कोठडी

आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील सुदेश दळवी यांनी, आरोपींचा गुन्हा करण्याचा हेतू काय होता, गुन्ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथदार आहेत काय, गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करायचे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news