नेवासाच्या कुख्यात त्रिकुटाला पिस्तुलासह बेड्या file photo
छत्रपती संभाजीनगर

नेवासाच्या कुख्यात त्रिकुटाला पिस्तुलासह बेड्या

केम्ब्रिज चौकात एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nevasa's notorious trio arrested with pistols

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना येथून केम्ब्रिज चौक परिसरात आल्यानंतर आपापसांत भांडण करत गोंधळ घालणाऱ्या तिघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासणीत तिघेही नेवासा येथील कुख्यात गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे आढळून आली.

शुभम संजय सोमासे (२५), अशोक विष्णू आढरे (३९) आणि अजय शिवाजी मगर (२६, तिघेही रा. नेवासा, जि. आहिल्यानगर) अशी आर-ोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, एमआयडीसी सिडको पोलिसांना बुधवारी (दि.८) रात्री गस्तीवर असताना केम्ब्रिज चौक, जालना रोड येथे तिघे आपापसांत भांडण करत असून, त्यांच्याकडे कार, १ गावठी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे असल्याची माहिती बातमीदाराने दिली.

पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी तात्काळ विशेष पथकाचे अधिकारी सपोनि भरत पाचोळे, उपनिरीक्षक लखनसिंग पचलोरे, संजू काळे, दशरथ जाधव, हवालदार संतोष सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे आदींच्या पथकाला घटनास्थळी पाठवून कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने तिघांना ताब्यात घेत झडती घेतली असता, शुभम सोमासे याच्याकडे गावठी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे आढळून आली. कारवाईत पोलिसांनी पिस्तूल, काडतुसे, मोबाईल आणि कार असा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला.

मध्यप्रदेशातून आणला कट्टा

शुभम सोमासे आणि अजय मगर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. चौकशीत त्यांनी मध्यप्रदेशातून गावठी कट्टा आणल्याची कबुली दिली. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची हसूल कारागृहात रवानगी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT