छत्रपती संभाजीनगर

Narcotics : विविध गुन्ह्यांत जप्त ४९ लाखांचे अमली पदार्थ नष्ट

३४३ किलो गांजा, चरससह कफ सिरपचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Narcotics worth ₹49 lakh seized in various cases destroyed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेले तब्बल ४९ लाख २ हजार ८८३ रुपये किमतीचे अमली पदार्थ पोलिसांकडून नष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये ३४३ किलो ५७३ ग्रॅम गांजा व चरस तसेच नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीन औषधी सिरपच्या ४९९ बाटल्यांचा समावेश होता. या सर्व मुद्देमालाची पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशान्वये कायदेशीररीत्या विल्हेवाट लावण्यात आली.

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातील केंद्रीय गोदामात हा सर्व जप्त मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यात आला होता. हा मुद्देमाल एमआयडीसी वाळूज, उस्मानपुरा, सिटी चौक, वेदांतनगर, हसूल, दौलताबाद, सिडको, एमआयडीसी सिडको, बेगमपुरा, वाळूज, सातारा आणि क्रांती चौक या पोलिस ठाण्यांतर्गत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आला होता.

एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल पोलिस बंदोबस्तात शासकीय वाहनाने पुण्यातील रांजणगाव येथील कंपनीत नेण्यात आला आणि तिथे तो नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, परिमंडळ-१ चे उपायुक्त पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव आणि सहायक आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, नियंत्रण कक्षाचे निरीक्षक राजेश यादव, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गणपत राहीर, सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांच्यासह अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे अंमलदार आणि संबंधित १२ ठाण्यांच्या मुद्देमाल मोहरील पथकाने सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT