गावातील अवैध दारू विक्रीविरोधात ग््राामसभेत ठराव मांडणाऱ्या नांदगाव तांडा येथील महिला. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Women protest liquor ban : नांदगाव तांडा येथील संतप्त महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार

ग्रामसभेत ठराव; राज्य मार्गावर रास्ता रोकोचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वरठाण : सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील संतप्त महिलांनी शुक्रवारी (दि.24) झालेल्या ग्रामसभेत गावातील अवैध दारू विक्रीविरोधात ठराव घेऊन नांदगाव तांड्यात बाटली आडवी करण्याचा संकल्प केला. संतप्त महिलांनी हात उंचावून ठरावाच्या बाजूने मतदान करून गावात दारू बंदीचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, अशी आग््राही मागणी केली. गावांत दारू विक्री बंद न झाल्यास सोयगाव - चाळीसगाव राज्य मार्गावर रास्ता रोको करण्याचेही ठरावात नमूद केले आहे.

सूचक नंदाबाई चव्हाण यांनी तर अनुमोदन शोभा बाई राठोड यांनी केले. दारूबंदीसह अवैधरीत्या सुरू असलेलले सर्व बंद करण्यात यावा, असा ठराव एकमताने मंजूर केला. यावेळी सहायक गटविकास अधिकारी अशोक दौड, ग््राामपंचायत अधिकारी सुवर्णा ननावरे यांची उपस्थिती होती. दरम्यान, दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास सोयगाव-चाळीसगाव मार्ग बंद आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

ग्रामसभेनंतर ढाबे, हॉटेलवर धडक

ग््राामसभेनंतर शेकडो महिलांनी थेट गावालगत असलेल्या ढाबे व हॉटेलवर धडक देत तेथील चालक व मालकांना दारू विक्री तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग््राामसभेचा ठराव सोयगाव पोलिस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस अधीक्षक तसेच पंचायत समिती यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT