Sindhudurg News : परप्रांतीयांना जमीन विक्री विरोधात असलदे ग्रामस्थांची एकजूट

रामेश्वर -पावणाई चव्हाटा मंदिरातील गावसभेत एकमुखी ठराव
Sindhudurg News
परप्रांतीयांना जमीन विक्री विरोधात असलदे ग्रामस्थांची एकजूट
Published on
Updated on

कणकवली : दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावा पाठोपाठ आता कणकवली तालुक्यातील असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला. गावाच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक, स्थानिकांचे हक्क, एकोपा राखण्याच्या संरक्षणासाठी हा एकमुखी ठराव करत निर्णय घेण्यात आला.

असलदे- गावठणवाडी येथील असलदे रामेश्वर -पावणाई चव्हाटा मंदिरात सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्षतेखाली गाव सभा आयोजित करण्यात आली होती. सोसायटी चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, असलदे तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब , माजी सरपंच सुरेश लोके, उद्योजक सुरेश डामरे, पत्रकार नरेंद्र हडकर , मानकरी उदय परब, शत्रुघ्न डामरे, दयानंद हडकर, प्रदीप हरमलकर , अनिल कोठारकर , अजय परब, प्रविण डगरे, सचिन लोके, मेहुल घाडी , योगेश डामरे, दिलीप डामरे, संतोष घाडी, पोलिसपाटील संजय गोरुले, आत्माराम घाडी, विजय डामरे, विजय आचरेकर, प्रशांत परब, बाबाजी शिंदे, परशुराम परब, मनोज लोके, गणेश तेली, विजय खरात, सचिन शिंदे, विजय परब, महेश लोके, श्रीराम मोरजकर, जयप्रकाश पाताडे, सुनील परब, हरिचंद्र जांभळे, शामराव परब, तुषार घाडी, गोविंद तावडे, प्रकाश खरात, संजय जेठे, सचिन हरमलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबरच पर्यावरणपूरक वातावरण कोकणात असल्यामुळे बाहेरील राज्यातील काही गुंतवणूक करणाऱ्या कंपनी, उद्योजक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करीत आहेत.

आगामी काळात गावातील जमीन विक्री झाल्यास भूमीपुत्र विस्थापित होवू शकतात. भविष्यात विक्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतर लढा उभारण्यापेक्षा आपल्या गावाची एकजूट ठेवून अशा जमीन खरेदी विक्री करणाऱ्या परप्रांतीयांना बंदी घालण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. त्यामध्ये गावातील हिंदू समाजाच्या रुढी परंपरा , पारंपरिक सण उत्सव , देवस्थानची कामे करताना बाधा निर्माण होवू शकतो. आगामी काळात भूमिपुत्रांमध्ये मतामतांतरे निर्माण होवू शकतात. परप्रांतीयांकडून जमीन खरेदीचे व्यवहार झाल्यास गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती, जंगल आणि जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या गावातील शेतक-यांच्या आंबा, काजू बागायतीवर असलेली उपजीविका जमीन न विकता ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news