Plastic Ban File Photo
छत्रपती संभाजीनगर

Banned plastics : बाहेरून येणाऱ्या प्लास्टिकवर महापालिकेची नजर

सार्को ट्रान्सपोर्टमधून १ हजार ८० किलो कॅरिबॅग जप्त : २५ हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation's eye on plastic coming from outside

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात बाहेरून दाखल होणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिकला आळा घालण्यासाठी महापालिकेने आता वाहतुकीच्या मार्गावरच कारवाई सुरू केली आहे. सार्को ट्रान्सपोर्ट येथे केलेल्या तपासणीत १ हजार ८० किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅगचा साठा आढळून आला. मनपाच्या पथकाने हा साठा जप्त करत संबंधितांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत शालिमार प्लास्टिकचे मालक नाजीम शेख यांच्या नावाने पाठविण्यात आलेला कॅरिबॅगचा साठा आढळून आला.

महापालिकेकडून शहरातील प्लास्टिक विक्रेते, घाऊक व्यापारी तसेच त्याचा वापर करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा पुरवठा बाहेरून होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने शहराच्या प्रवेशमार्गावर येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच शहरात प्लास्टिकचा साठा दाखल झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी त्याचा पुरवठाच रोखण्यावर आता प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी वाढविण्यात येणार आहे.

आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे यांच्या नियोजनातून ही कारवाई करण्यात आली. नागरिक मित्र पथकातील देविदास सुसर, विष्णू काकडे, मच्छिंद्र वाघ, कैलास भोसले, कैलास सोनवणे, बाबुराव सपकाळ तसेच जवान आनंद चावरिया यांनी कारवाईत सहभाग घेतला.

पुरवठादारांवरही कारवाई

प्रतिबंधित प्लास्टिक शहरात येऊ नये, यासाठी आणि पुरवठ्याच्या साखळीवर लक्ष केंद्रित करण्याचे मनपाने ठरविले आहे. शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री, वापर अथवा साठवणूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT