Sambhajinagar News : सिडकोकालीन सफाई कामगारांना महापालिका सेवेत सामावून घ्या !

कामगार कृती समितीचे स्थायी समिती सभापतींना निवेदन : समान कामाला समान वेतनासह वेतन फरक, महागाई भत्ता देण्याची मागणी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : सिडकोकालीन सफाई कामगारांना महापालिका सेवेत सामावून घ्या !file photo
Published on
Updated on

Accommodate the CIDCO-era cleaners in the municipal service!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिडको-हडको परिसरात दीर्घकाळापासून सफाईचे काम करणाऱ्या सिडकोकालीन कामगारांना विनाअट व विनाशर्त महापालिका सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी सिडकोकालीन सफाई कामगार कर्मचारी कृती समितीने केली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.३) स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

Sambhajinagar News
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज

सिडकोकालीन सफाई कामगार कर्मचारी कृती समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, सिडकोकालीन सफाई कामगारांनी अनेक वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा विचार करून पात्र कामगारांना त्यांच्या पात्रतेनुसार सफाई कामगार म्हणून महापालिका सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी समितीने केली. त्याचबरोबर समान स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देण्यात यावे, वेतन नियमित अदा करावे आणि प्रलंबित वेतन फरकाची रक्कम तत्काळ द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन अधिनियमांतर्गत महागाई भत्त्यात झालेल्या वाढीचा लाभही कामगारांना मिळावा. त्यानुसार १ जून २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी वेतनवाढ लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. यासह सिडको-हडको विभागात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या सिडकोकालीन सफाई कामगारांना कोणतीही अट न घालता महापालिका सेवेत सामावून घ्यावे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मालमत्ता कर थकबाकीदारांना मनपाचा दणका

याशिवाय सफाई कामगारांच्या वेतनातून बचत गटाच्या माध्यमातून कपात झालेल्या रकमेसंदर्भात आवश्यक कार्यवाही करून ती रक्कम संबंधित कामगारांना परत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सभापती अनिल मकरिये यांनी कामगारांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतल्या. संबंधित विभागांकडून आवश्यक माहिती आणि नोंदी तपासून मागण्यांचा नियमानुसार विचार करण्यात येईल. तसेच सकारात्मक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news