मनपाचा 47 लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर file photo
छत्रपती संभाजीनगर

मनपाचा 47 लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर

३ हजार २२४ कोटी खर्चाचा ताळेबंद : ४३४ कोटींच्या नवीन विकासकामांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation Presents Budget with a Surplus of ₹47 Lakhs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:

महापालिकेने गतवर्षाच्या अर्थसंकल्पानुसार २७ कोटी ५९ लाख ३ हजार रुपये प्रारंभीच्या सुधारित शिलकीसह २०२६-२७या आर्थिक वर्षासाठी ३ हजार १९६ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपये अपेक्षित जमेचा आणि ३ हजार २२३ कोटी ९० लाख ५३ हजार रुपये अपेक्षित खर्चाचा असा एकूण ४७ लाख १५ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि.२५) स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांच्याकडे सादर केला.

यात नव्या व जुन्या ६३६ कोटी १४ लाख रुपयांच्या कामाचा समावेश असून प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर, तसेच नागरिकाभिमुख सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला आहे. यात ४३४ कोटी ६८ लाखांच्या शहरातील नविन विकासकामांचा समावेश असून उत्पन्न वाढीसाठी मनपा ग्रीन बॉण्डची खरेदी करणार आहे. तर यंदा प्रथमच तुतीय पथांच्या कौशल्या विकासासाठी २० लाखांची तरतुद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने विविध विभागकडून प्राप्त झालेल्या विकासकामांच्या प्रस्तावांचा आढावा घेऊन व नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांराधारे अर्थसंकल्पाचा आराखडा तयार केला आहे.

हा अर्थसंकल्प बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांच्याकडे सादर केला. यावेळी मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, अति. आयुक्त कल्पीता पिंपळे, नगरसचिव नंदकिशोर भोंबे, शहर अभियंता संजय कोंबडे, मुख्य लेखा परिक्षक शिवाजी नाईकवाडे, नगररचना उपसंचालक मनोज गर्जे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, उपायुक्त अपर्णा थेटे आदीसह विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

महापालिकेचा ४६ वा अर्थसंकल्प महाराष्ट्र मनपा अधिनियमाचे कलम १०३व १०४ नुसार सन २०२५-२६ चे सुधारीत व कलम ९५, केले. ९६ व १०० अन्वये सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे मुळ अर्थसंकल्प मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सादर केला. प्रारंभी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी तयार केलेला अर्थसंकल्प मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सभापती अनिल मकरीये यांच्याकडे सादर करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत जी. श्रीकांत यांनी या अर्थसंकल्पामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना कार्यालयात न येता सर्व सेवा घरबसल्या देण्याचा मानस व्यक्त केला,

असा येणार पैसा

वस्तू आणि सेवा करातून ४८८ कोटी, २० लाख

मुद्रांक शुल्कपोटी १६ कोटी

मालमत्ता कर मागणी ४५० कोटी

पाणीपट्टी थकबाकीसह मागणी २०० कोटी

हॉकर्स झोन ५ कोटी, लाख

बाजार परवाना शुल्क

आकारणी ४ कोटी

पे अॅण्ड पार्कमधून ५

कोटी

व्यापारी संकुल, नाट्यगृहे ३ कोटी ५० लाख

भूखंड, दुकाने भाडेपट्टा २ कोटी रुपये

आठवडी बाजार २७.५० लाख रुपये

जाहिरात बोडांचे भाडे ४ कोटी

नगररचना विभागापासून ३ कोटी ५१ लाख

गुंठेवारी १०० कोटी

विशेष शासकीय अनुदान १३१.७१ कोटी

पाणी विक्रीतून ८ कोटी

असा जाणार पैसा

प्रशासकीय खर्च ४७४.०२ कोटी

दिवाबत्ती देखभाल दुरुस्ती १९.८२ कोटी

पथदिवे १६ कोटी

दिव्यांगासाठी २१.२५ कोटी

महिला व बालकल्याण ७ कोटी

ट्रान्सजेंडर सक्ष्मीकरण २० लाख

पाणी पुरवठा व

जलनिःसारण विभाग १८ कोटी

सुखना नदी २ कोटी

पशुसंवर्धन २.५० कोटी

छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम ५० कोटी

श्वान स्माशानभूमी १ कोटी

देशी खेळांना चालना २.५ कोटी

क्रीडा योजनांसाठी ६१.२० कोटी

आपत्ती व्यवस्थापनासाठी ५.९० कोटी

पर्यावरण संवर्धनासाठी ५ कोटी ७० लाख

पर्यटन विभाग २.३० कोटी

अग्रिशमन विभाग १६ कोटी ७१ लाख

आरोग्य २.६८ कोटी

शिक्षण विभाग ५ कोटी

संगणक विभाग ५ कोटी

यांत्रिकी विभाग ३४.२१ कोटी

मध्यवर्ती भांडार ७.६० कोटी

विद्युत विभाग १९.८२ कोटी

खेळाच्या मैदानांसाठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT