Sambhajinagar News : मनपा सभापतींकडून जन्म-मृत्यू विभागाची अचानक पाहणी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मनपा सभापतींकडून जन्म-मृत्यू विभागाची अचानक पाहणी

प्रलंबित अर्जाचा घेतला आढावा : नागरिकांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation Chairperson conducts surprise inspection of the Birth and Death Department

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिका स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी बुधवारी (दि.१९) अचानक जन्म-मृत्यू विभागातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रमाणपत्रासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

प्रमाणपत्रासाठी जन्म-मृत्यू महापालिकेत खेट्या माव्या लागत असून प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत सभापती अनिल मकरिये यांनी बुधवारी अचानक या विभागाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांना करावी लागणारी प्रक्रिया, अर्जाची सद्यस्थिती आणि प्रलंबित प्रकरणांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

यात विभागातील प्रलंबित अर्जाचा मुद्दा पाहणीचा महत्त्वाचा भाग होता. किती अर्ज प्रलंबित आहेत, त्यावर कोणत्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे आणि निपटाऱ्यासाठी किती कालावधी लागणार आहे, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. त्यानंतर मकरिये यांनी प्रमाणपत्रासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये, त्यांचे अर्ज ठरावीक वेळेत निकाली काढावेत आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यासह नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाहणीदरम्यान जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आलेल्या नागरिकांशी मकरिये यांनी प्रत्यक्ष चर्चा केली. प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी, काम पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी आणि कार्यालयीन प्रक्रियेत काही अडथळे येतात का, याची माहिती त्यांनी घेतली.

वेळेत कामे पूर्ण करा

नागरिकांची कामे विनाकारण रखडू नयेत, अर्जाचा वेळेत निपटारा व्हावा आणि विभागातील प्रक्रिया अधिक गतिमान व नागरिकाभिमुख करावी, अशा स्पष्ट सूचना सभापती मकरिये यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT