Sambhajinagar Political News : खा. संदीपान भुमरे यांची ईडी चौकशी झाली पाहिजे File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Political News : खा. संदीपान भुमरे यांची ईडी चौकशी झाली पाहिजे

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

MP Sandipan Bhumre should be investigated by ED

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे दीडशे कोटींची जमीन आली. ही जमीन कशी आली. हा एकप्रकारचा घोटाळा आहे. त्यामुळे भुमरेंची ईडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेखला हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाकडून १५० कोटींची जमीन गिफ्ट मिळाली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची जागा भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट कशी मिळाली याची सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शहरातील दाऊदपुरा परिसरातील ही ३ एकर जागा मूळ हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाची होती. त्यांनी भुमरेंच्या ड्रायव्हरला ती गिफ्ट म्हणून दिली आहे.

साधारण ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या रकमेची जागा गिफ्ट कशी मिळाली असा संशय आता निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात येत आहे. यावरून आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजी खासदार चंदक्रांत खैरे यांनी भुमरेंच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे.

खैरे म्हणाले, भुमरेंनी याआधीही ठिकठिकाणी दारूची दुकाने उघडली आहेत. आता हा दीडशे कोटींच्या जागेचा घोटाळा समोर आला आहे. भाजप सरकारने संजय राऊत यांना कोणताही घोटाळा केला नसताना ईडी चौकशीच्या नावाखाली जेलमध्ये टाकले. आता भुमरेंच्या ड्रायव्हरचा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही तशी धमक दाखवावी, अशी मागणी खैरे यांनी दै. पुढारीशी बोलताना केली.

'लोकसभा काय' कळतही नाही

भुमरे हे नावाचेच खासदार आहेत. खासदार म्हणून त्यांनी कोणतेही काम केले नाही. त्यांना लोकसभा काय हेच कळलेले नाही. केवळ दारूची दुकाने सुरू करणे हाच त्यांचा धंदा आहे. हे भाजप, संघ परिवाराला कसे आवडते. आता हा नवा घोटाळा समोर आला आहे. आम्ही मुसलमानाबरोबर गेलो तर नाव ठेवता, इथे तुम्ही मुसलमानाबरोबर पार्टनरशिप करता. सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, लोक शांत बसणार नाहीत, आम्ही शांत बसणार नाही, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT