Crime News : मेहुणीचा विनयभंगः ॲट्रॉसिटीसह गुन्हा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : मेहुणीचा विनयभंगः ॲट्रॉसिटीसह गुन्हा

घरातून हाकलून दिल्याच्या रागातून बहिणीच्या पतीने पीडितेचा अश्लील व्हिडीओ काढून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Molestation of sister-in-law: Case registered under Atrocities Act

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घरातून हाकलून दिल्याच्या रागातून बहिणीच्या पतीने पीडितेचा अश्लील व्हिडीओ काढून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गणेशनगर-पुंडलिकनगर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, २५ वर्षीय पीडित तरुणीच्या बहिणीचा पती विशाल राजेंद्र सोनवणे (रा. गल्ली क्रमांक ५, गणेशनगर) याने २६ जानेवारी रोजी दुपारी तरुणीला फोन करून, तू मला घरातून का बाहेर काढलेस, याचा बदला घेणार अशी धमकी देत व्हॉट्सअॅपवर तरुणी झोपेत असताना तिच्या पाठीमागून अंगाला हात लावत असलेला व्हिडीओ पाठवला. हा व्हिडीओ पीडितेच्या नकळत चित्रित करण्यात आला होता. याशिवाय इतर काही व्हिडीओही पाठवण्यात आले होते. मात्र ते पाहण्यापूर्वीच आरोपीने ते डिलीट केले.

या प्रकारामुळे हादरलेल्या पीडित तरुणीने आरोपीला फोन करून जाब विचारला असता, आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्ही खालच्या जातीचे आहात, तुम्हाला असेच वागवले जाते. हिंमत असेल तर बाहेर ये, तुझे फोटो आणि व्हिडीओ इतरांनाही पाठवतो, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या गंभीर प्रकारानंतर पीडित तरुणीने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विशाल सोनवणे याच्याविरुद्ध विनयभंग, धमकी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर करीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT