Sambhajinagar ZP Election| जिल्हा परिषद निवडणुकीत माघार घेतल्याने भर चौकात शिवसेनेच्या उमेदवारावर शाई फेकली

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने शिल्लेगाव गटासाठी माजी सभापती सुनील केरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती
Shillegon Zilla Parishad Election
शिल्लेगाव गटातील उमेदवाराला शिवसेना कार्यकर्त्यांनी शाईनं अंघोळ घालत जाहीर निषेध नोंदवला Pudhari
Published on
Updated on

Shillegon Zilla Parishad Election

गंगापूर : पदाधिकारी, स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेतृत्वाला पूर्णतः अंधारात ठेवून जिल्हा परिषद शिल्लेगाव गटातील अधिकृत उमेदवारी अर्ज अचानक मागे घेणाऱ्या उमेदवाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. संतप्त कार्यकर्त्यांनी संबंधित उमेदवाराला भर चौकात गाठत शाईनं अंघोळ घालून जाहीर निषेध नोंदवला. या घटनेमुळे गंगापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने शिल्लेगाव गटासाठी माजी सभापती सुनील केरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोणतीही पूर्वकल्पना न देता, पक्ष पदाधिकारी, स्थानिक नेतृत्व अथवा वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता त्यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला. या धक्कादायक निर्णयामुळे पक्षात तीव्र संतापाची लाट उसळली.

Shillegon Zilla Parishad Election
Sambhajinagar News : युवा मराठा प्रीमियर लीगचा थरार

शिवसेना उपशहरप्रमुख व गंगापूर निवडणूक निरीक्षक राजेंद्र दानवे, नंदू लबडे यांनी सुनील केरे यांना जाब विचारला असता, उपस्थित कार्यकर्ते आक्रमक झाले. “हा निर्णय नाही, हा थेट विश्वासघात आहे,” असा आरोप करत कार्यकर्त्यांनी सार्वजनिकरित्या शाई फेकून आपला रोष व्यक्त केला.

कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की,“ही उमेदवारी वैयक्तिक नव्हती, ही पक्षाची होती. पक्षाच्या चिन्हावर आणि विश्वासावर उमेदवारी मिळते. त्यानंतर पक्षालाच अंधारात ठेवून माघार घेणे म्हणजे सरळसरळ विश्वासघात आहे.

Shillegon Zilla Parishad Election
Chatrapati Sambhajinagar : टीव्हीसेंटर चौकातील ऑक्सिजन हबवर कु-हाड

या घटनेमुळे शिवसेना (उबाठा) गंगापूर तालुक्यातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून, संघटनात्मक शिस्तीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष पसरला असून, संबंधित उमेदवारावर वरिष्ठ पातळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत उमेदवारी मागे घेण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप स्पष्ट शब्दांत केला जात असल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले आहे. हा प्रकार केवळ उमेदवारीपुरता मर्यादित न राहता, पक्षनिष्ठा, विश्वासार्हता आणि राजकीय नैतिकतेचा मुद्दा बनला असून, येत्या निवडणुकीत याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news