छत्रपती संभाजीनगर : किराणा दुकानात सामान घेण्यासाठी निघालेल्या १५ वर्षीय मुलीला भररस्त्यात एकाने हात पकडून तू मेरी हैं, मुझसे शादी नहीं की तो तुझे किसी की नहीं होणे दूंगा, जान से मार दूंगा, अशी धमकी दिली. त्यानेच तिचे मॉर्फ फोटो व्हायरल करून बदनामीही केली.
ही घटना बुधवारी (दि. २८) सिटी चौक भागात घडली. अरबाज अली आसिफ अली (रा. चेलीपुरा) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
३२ वर्षीय फिर्यादी यांनी त्यांच्या १५ वर्षीय मुलीचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले होते. ते फोटो आरोपी अरबाजने मॉर्फ करून १२ जानेवारीला नातेवाइकांमध्ये व्हायरल करून बदनामी केली. त्यानंतर त्याला समजावून सांगितल्यानंतर त्याने ते फोटो, व्हिडिओ डिलिट केले होते.
मंगळवारी (दि. २७) फिर्यादी यांची मुलगी ही रात्री साडेआठच्या सुमारास किराणा दुकानावर सामान घेण्यासाठी निघाली होती. रस्त्यात आरोपी अरबाजने तिचा हात धरून ओढले. तू मेरी है, मुझसे शादी नहीं की तो मैं जान से मार दूंगा, असे बोलून तिच्याशी लगट करून विनयभंग करून धमकावले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात पोक्सोसह अन्य कलमानुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.