Marathwada Ratna Award 2026 Announced; Actress Varsha Usgaonkar is the chief guest
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी 'मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६' जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचा भव्य सन्मान सोहळा रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ट्रीट इम्पीरियल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. क्षेत्रांत यावर्षी विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची 'मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६' साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये श्री. समीर राजूरकर, महापौर, छत्रपती संभाजीनगर, श्री. सागर जाधव, सदस्य, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, संभाजीनगर तसेच सचिव, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, श्री. सतीश कल्याणकर, व्यवस्थापकीय संचालक, वेदांत इनोटेक प्रा. लि., श्री. नीरज शुक्ला, झोनल हेड, यूको बँक, श्री. नंदकिशोर वल्ले पाटील, श्रीकृष्ण ऑर्गेनिक, छत्रपती संभाजीनगर, आणि श्रीमती अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान दिले असेल किंवा आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी केली असेल, तर आपणही 'मराठवाडा रत्न' पुरस्कारासाठी नामांकन करू शकता. सामाजिक कार्य, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, कृषी, आरोग्य, कला-क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि उद्योजकांना या पुरस्कारासाठी नामांकनाची संधी उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
पुरस्कारासाठी नामांकन, कार्यक्रमातील सहभाग आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आयोजकांच्या टीमशी संपर्क साधावा. तसेच दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन पुरस्कारासंदर्भातील सविस्तर माहिती मिळवता येईल.