

False propaganda that Kunbi certificates are not being issued
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी प्रमाणपत्राबाबत अधिकारीच अडवणूक करीत असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यात ३ लाख १६ हजार ९७७ प्रमाणपत्रे वितरित केले. त्यासोबतच १६ हजार ११० जात वैधता प्रमाणपत्रेही दिली. सरकारने जरांगे यांच्या १२ मागण्यांही मान्य केल्या. त्यामुळे आता गैरसमज दूर करून मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, मराठवाड्यातील दुष्काळाच्या संकटाचाही विचार करावा, असे आवाहन मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी (दि ९) स्मार्ट सिटी कार्यालयातील पावणे तीन तासांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना केले.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या परवानगीने मराठवाड्यातील प्रमाणपत्र प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व अभ्यासकांची बैठक झाली. त्यात एसओपीमध्ये काही बदल करावे का, अडचणी सोडविण्यासाठी काय करावे, याबाबत चर्चा केली. आ
तापर्यंत जात वैधतेसाठी २१ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १६ हजार ११० वैधता प्रमाणपत्रे वितरित केली. केवळ ६४ प्रमाणपत्रे अवैध ठरली, ती का याबाबतही बैठकीत माहिती घेतली. २ हजार ३१४ प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश विखे पाटील यांनी दिले. हैदराबाद, सातारा व कोल्हापूर गॅझेटबाबतही प्रक्रिया सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट
परभणीत शून्य पेंडन्सी परभणीमध्ये जात वैधतेसाठी १२७१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८२५ वैध, प्रलंबित शुन्य आहे, मराठवाड्यात २० दिवसांवरील पेंडन्सी शून्य आहे. १ ते २० दिवसातील प्रलंबित अर्ज १८८ आहेत, तेही तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले. धाराशिव, लातूरमध्ये अवैधची संख्या शून्य आहे. बीडमध्ये जात वैधतेसाठी १३ हजरी ७७४ अर्ज प्राप्त त्यापैकी ११ हजार ४३७ जात वैधता प्रमाणपत्रे वितरित तर केवळ २ अवैध ठरविले
अवैध ठरल्याची कारणे
वंशावळ सिद्ध न होणे, महसूल व शालेय नॉर्दीमध्ये कुणबी जात नोंद नसणे किंवा वंशावळ अपूर्ण असणे आदी कारणांमुळे काही प्रमाणपत्रे अवैध ठरल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतनिहाय याद्या प्रसिद्ध
जरांगे यांच्या मागणीनुसार ५८ लाख नोंदींची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून ७सप्टेंबरपासून ग्रामपंचायतनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत.
आतापर्यंत कुणब प्रमाणपत्र वितरिव
न्या. शिंदे समिती स्थापन झाल्यानंत मराठवाड्यात मराठा कुणबी, कुणब आणि कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी लाख १७ हजार ५५० अर्ज प्राप्त झाले त्यापैकी ३ लाख १६ हजार ९७प्रमाणपत्र वितरित केले असून ४४ अ प्रलंबित, तर ५४८ अर्ज अवैध ठर आहेत. एसईबीसीच्या १० टक आरक्षणातूनही २ लाख ९५ हज ३०५ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत-
संभाजीनगरात बसून दंगल घडविण्याचे षडयंत्र : जरांगे
एकनाथ शिंदे, विखेंसह अनेक मंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
वडीगोद्री, (जि. जालना) पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सांमत, संजय शिरसाट, शंभुराज देसाई, प्रताप सरनाईक आदी मंत्र्यांवर टीकेची झोड उठवित छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या बैठकांत दंगल घडविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्ये मारामाऱ्या घडवून आणायच्या आहेत. दंगल करायची आहे. या आंदोलनात ते होणार असून सर्व गोष्टीला एकनाथ शिंदेच जबाबदार राहतील, असा खळबळजनक आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे.
जरांगे यांच्या उपोषणाचा बुधवारी बारावा दिवस होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सलाईन घेतले असून, सामंत आणि आ. प्रसाद लाड यांनी संभाजीनगरात घेतलेल्या पत्रपरिषदेनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. १२ तारखेपर्यंत आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करा, नसता मुंबईत येण्याचा मार्ग मोकाळा आहे, असे त्यांनी सरकारला ठणकावले. उद्य सांमत हे संयमाची भाषा करीत आहेत. आम्ही अजूनही संयम बाळगून आहोत. सणवार आणि दुष्काळी परिस्थिती पाहून उपोषण मागे घेण्याचे आवाहन निरर्थक आहे. बैलाच्या पोळ्यात तुम्हाला नाचायचे आहे का असा सवाल करीत आरक्षण, हैदराबाद गॅझेट याविषयावर मंत्री बोलत नाहीत. मंत्री नेत्यांविषयी बोलतात, आपण समाजासाठी बोलतो असा दावा त्यांनी केला, माझ्या भाषेच निमित करून या विषयातून पळ काढू नका. तुम्ही फक्त आडवे या. तुम्ही राजकारणात नसतात तर आम्ही तुम्हाला मोजलेही नसते, असे ते म्हणाले