Bjp pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Maharashtra MLC Election 2026 : मराठवाडा पदवीधरसाठी वर्षभरापासून भाजप तयारीत; महायुतीच्या बैठकीनंतर घेणार निर्णय

Marathwada Graduate MLC Election 2026 : भाजपकडून मतदार नोंदणीला जोर

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मतदार संघासाठी मागील वर्षभरापासून भाजप मतदार नोंदणीवर भर देत तयारी करीत आहे. विभागातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाकडे इच्छुक उमेदवार आहेत. परंतु, सध्या या मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चस्व आहे. त्यामुळे महायुतीच्या बैठकीनंतरथ भाजप निवडणूक लढायची की नाही, याबाबत वरिष्ठ पातळीवरव निर्णय होणार असल्याचे माजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी मराठवाडा पद‌वीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर केली. या घोषणेनंतर आता विभागात निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यासोबतच राजकीय पक्षांनी देखील बैठकांना सुरुवात केली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच ताबा आहे. त्यात मागील वेळी भाजपने जोरदार तयारी केली होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी सलग तीन वेळा माजप उमेदवाराचा पराभव केला आहे. यात पहिल्यांदा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्रीकांत जोशी यांचे २००८ मध्ये तर त्यानंतर दोन वेळा शिरीष बोराळकर यांना पराभूत करीत विजयाची हॅट्रीक केली होती.

यंदा या मतदार संघावर भाजपने विशेष लक्ष देत वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे, त्यात आमदार चव्हाण विरुद्ध गंगापूरचे आमदार प्रशांत बंच यांच्यातील वाद देखील सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे भाजपकडून चव्हाण यांच्याविरोधात कंबर कसण्यात आली आहे. परंतु, असे असले तरी यंदा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे त्यात या मतदार संघाचे विद्यमान आमदार है राष्ट्ररवादीचे आमदार सतीश चव्हाण आहेत. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतेच निवडणूक लढावी की नाही, याबाबतचा निर्णय घेतली, असे संकेत स्थानिक नेत्यांकडून देण्यात येत आहे. परंतु, माजफ्ते या मतदार संघासाठी सुक्ष्म तयारी केल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले, ते म्हणाले वर्षभरापासून पदवीधर नोंदणीसाठ भाजप घराघरांत पोहचला आहे. त्यामुळे पक्षादेशाकडे लक्ष असल्याचेही ते म्हणाले.

संभाजीनगरमध्ये चारपेक्षा अधिक इच्छुक

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडे वारपेक्षा अधिक इच्छुक आहेत. त्यात माजी आमदारांसह कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विभागात सर्वाधिक इच्छुक संभाजीनगमध्येच असल्याचेही सांगण्यात येत आहे.

महायुतीच्या बैठकीत ठरेल - अतुल सावे, कॅबिनेट मंत्री

राज्यात आम्ही प्रत्येक निवडणुका या महायुतीत लढत आहेत, त्यामुळे मंगळवारी मराठवाला पदवीधर मतदार संघासोबतच इतर मतदार संघाच्या देखील निवडणूका घोषित झाल्या आहेत. त्यासाठी महायुतीची बैठक त्यात कोणी, कोणत्या मतदार संघात उमेदवार द्यायचा है वरिष्ठ नेते ठरवतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT