Alzheimer's disease : ६० वर्षांवरील ८ टक्के ज्येष्ठांना अल्झायमरचा त्रास

तज्ज्ञ म्हणतात : लक्षणांकडे दुर्लक्ष नको, वेळीच निदान अन् उपचार महत्त्वाचे
Alzheimer's disease
Alzheimer's diseasefile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अल्झायमर हा मेंदूच्या पेशींवर हळूहळू परिणाम करणारा आणि कालांतराने स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता तसेच दैनंदिन वर्तनावर प्रभाव टाकणारा गंभीर आजार आहे. डिमेंशियाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ६० ते ७० टक्के रुग्णांमध्ये अल्झायमरचा सहभाग आढळतो. तर ६० वर्षांपुढील सुमारे ८ टक्के ज्येष्ठांना अल्झायमरची समस्या भेडसावते, असे मेंदूविकारतज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे वाढत्या वयात विसर पडतोच, असे म्हणून दुर्लक्ष न करता वेळीच निदान आणि उपचार महत्वाचे असल्याचेही सांगितले.

वय वाढल्यानंतर काही गोष्टी विसरणे सामान्य असू शकते. मात्र, वारंवार एकाच गोष्टी विचारणे, नेहमीच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग विसरणे, दैनंदिन कामे करण्यात अडचण येणे, पैशांचे व्यवहार किंवा औषधांचे वेळापत्रक सांभाळता न येणे, जवळच्या व्यक्तींना ओळखण्यात अडचण येणे किंवा व्यक्तिमत्त्व व वर्तनात लक्षणीय बदल होणे ही अल्झायमर किंवा इतर प्रकारच्या डिमेंशियाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे स्मरणशक्तीतील बदलांकडे सुरुवातीपासूनच गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. असेही तज्ज्ञ म्हणाले.

Alzheimer's disease
Manoj Jarange Patil | चौकशांना घाबरत नाही, तुरुंगात जायलाही तयार : मनोज जरांगे

तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. जयपाल घुनावत म्हणाले, अल्झायमरचे निदानासाठी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, बौद्धिक क्षमतांची तपासणी, रक्त चाचण्या आणि मेंदूच्या इमेजिंग चाचण्यांचा विचार केला जातो. विस्मरणामागे इतर उपचार करता येण्या जोगी कारणेही असू शकतात, त्यामुळे स्वतःहून निष्कर्ष न काढता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी तरुणांनी लक्ष द्यावे

  • नियमित शारीरिक हालचाल आणि संतुलित आहार.

  • रक्तदाब व मधुमेहावर योग्य नियंत्रण.

  • पुरेशी झोप, सामाजिक सहभाग आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणे.

  • धूम्रपानासारख्या धोकादायक सवयी टाळणे.

Alzheimer's disease
Dharashiv rainfall : धाराशिव जिल्‍ह्यात पावसाचे पुनरागमन

उपचाराने जीवन सुरक्षित व सुसह्य

मेडीकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे म्हणाले, अल्झायमर हा केवळ विस्मरणाचा आजार नसून रुग्णाच्या व कुटुंबाच्या संपूर्ण दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी अवस्था आहे. त्यामुळे या बदलांकडे ‘म्हातारचळ’ म्हणून दुर्लक्ष करू नये. वेळेत तज्ज्ञांचा सल्ला, अचूक निदान, योग्य उपचार आणि कुटुंबीयांचा आधार यांमुळे रुग्णाचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुसह्य करता येते.

काय म्हणतात तज्ज्ञ डॉक्टर्स

वयाच्या ६० वर्षांनंतर वाढतो धोका याबाबत मेडीकव्हर हाॅस्पिटलमधील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत देशमुख म्हणाले, वयाच्या ६० वर्षांपुढे अल्झायमरचा धोका वाढत जातो. अशा ८ टक्के रुग्णांना हा आजार घेरतो. सुरुवातीची लक्षणे अनेकदा साध्या विस्मरणासारखी वाटल्याने कुटुंबीय त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, उपचारांच्या माध्यमातून रुग्णाची कार्यक्षमता व जीवनमान अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news