Maratha reservation Manoj Jarange Patil News
१३ जुलैला शहरात मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण संवाद रॅली आहे.  Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Maratha reservation| छ. संभाजीनगर : '१३ जुलै'ला जरांगेंची मराठा आरक्षण संवाद रॅली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : १३ जुलैला शहरात मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण संवाद रॅली आहे. सिडको चौक ते क्रांती चौकादरम्यान ही रॅली आयोजित केली असून लाखोंचा जनसमुदाय उसळणार असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून केंम्ब्रिज चौक ते नगरनाका हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहराची जीवनवाहिणी असलेला जालना रोड बंद राहणार असल्यामुळे शहरवासियांनी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी. बंदोबस्त प्रभारी अधिकारी आवश्यकतेनुसार काही बदल करतील. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल व इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना हा नियम लागू नसेल, असे उपायुक्त (मुख्यालय) शीलवंत नांदेडकर यांनी सांगितले.

१३ जुलैची कारागृह शिपाई भरती ३ आॅगस्टला

विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर कारागृह पोलिस शिपाई पदाच्या भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे. १३ जुलैला मराठा आरक्षण संवाद रॅली असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उसळणार आहे. जालना रोड पूर्णपणे बंद असल्यामुळे उमेदवारांची अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १३ जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी ३ आॅगस्टला ठेवण्यात आली आहे, असे उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सांगितले.

या मैदानांवर पार्किंग व्यवस्था

- जालन्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी रामनगर कमानी, ग्रॅमफाेर्थसमोरील पार्किंग

- सिल्लोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी शरद टी जवळील खुले मैदान, आंबेडकर चौक- पिसादेवी रोडवरील राम मंदिर ट्रस्ट मैदान, मिलिनियम पार्कसमोरील मैदान

- कन्नड, वैजापूर व नगरकडून येणाऱ्यांसाठी आयकर भवन जवळील फुटबॉल मैदान, कर्णपुरा पार्किंग, अयोध्या मैदान

- पाचोडकडून येणाऱ्यांसाठी जबिंदा मैदान

- पैठणकडून येणाऱ्यांसाठी अयोध्या मैदान

हे मार्ग राहणार बंद

- केम्ब्रिज चौक ते नगरनाका चौक

- कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक

हे आहेत पर्यायी मार्ग

- केम्ब्रिज चौक- झाल्टा फाटा ते बीड बायपासने महानुभाव आश्रम चौक मार्गाने जाणे व येणे

- केम्ब्रिज चौक ते सावंगी बायपास- हर्सूल टी- हडको कॉर्नर - अण्णाभाऊ साठे चौक - सिटी क्लब, मिल कॉर्नर - बाबा पेट्रोल पंप चौक मार्गाने जातील व येतील

- नगरनाका - लोखंडी पूल - पंचवटी - रेल्वे स्टेशन - महानूभाव आश्रम चौक मार्गे जातील व येतील.

- सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाने जातील व येतील

- कोकणवाडी चौक - पंचवटी चौक - महावीर चौक मार्गे पुढे जातील व येतील

- शहरातील नागरिकांनी जालना रोड ऐवजी इतर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी केले.

SCROLL FOR NEXT