Manoj Jarange : मराठ्यांचे वाटोळे शरद पवारांनीच केले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange : मराठ्यांचे वाटोळे शरद पवारांनीच केले

मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच पवारांवर थेट टीका

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange's first direct criticism of Pawar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : १९९४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसींना देऊन मराठा समाजाचे वाटोळे केले, त्याचे नुकसान आम्ही आजही भोगत आहोत, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली. मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर या विषयासंबंधी थेट टीका केली हे विशेष.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सातत्याने मराठा आरक्षणाच्या जीआरवर टीका करत असले तरी ओबीसींच्या इतर जातींचा खरा घात मंत्री छगन भुजबळ आणि वडेट्टीवार जोडीनेच केला असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. जरांगे यांच्यावर प्रकृती शहरातील गॅलक्सी रुग्णालयात अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू असून, सोमवारी (दि.५) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येवल्याचा अलिबाबा अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांच्यावर करत जरांग म्हणाले की, भुजबळ यांना नेतेगिरीच वेड लागले आहे. त्यांनी धनगर, बंजारा, राजपूत, कुंभार समाजांतील कुणाला नेता होऊ दिले नाही. ओबीसीतील अठरा पगड जातीतील त्यांनी नेता होऊ दिला नाही, त्याने खरे दुखणे नेता आहे.

भुजबळ यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी मोठे केले. त्यांनाही भुजबळांनी दगा फटका केला, जात्ता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फड़सवीस यांचा गेम लावत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मराठ्यांना आरक्षण दिले. समाजातील गोरगरिबांच्या मुलांचे भले व्हावे, यासाठी सरकारने ही भूमिका घेतली. तर यांच्या पोटात का दुखायला लागले आहे, असा प्रश्नही त्यांनी पेवल्याचा अलिबावा असा उल्लेख करत भुजबळांना उद्देशून केला.

आमचे १६ टक्के आरक्षण आम्ही घेणारच !

जरांगे ओबीसी नेत्यांना उद्देशून म्हणाले, तुमचे फक्त १४ टक्के आरक्षण आहे, त्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी आममी मागणी आहे. पण १६ टक्के आरक्षण आमचे आहे, ते आम्हाला पाहिजे. ते आम्ही घेणारच. आरक्षण हे ५० टक्क्यपिक्षा २ टक्के तर गेले असून, ते रद्द करा, अन्यथा त्यासाठी लवाई सुरू करणार आहे.

भुजबळांपासून सरकार, मराठ्यांनी सावध राहावे

मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणारा नागपूरचा मोर्चा हा काँग्रेसचा आहे. भुजबळ व विजय वडेट्टीवार हे भेटले आहेत. आता हळूहळू तो बाहेर पडत आहे. तसेच षडयंत्र शिजताना दिसत आहे. दोघांनी भेटून हे ठरवलेले आहे. आता ते मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याही मागे लागले आहेत. भुजबळ हे सरकारला आणि मराठा-ओबीसी वादालासुद्धा घातक आहे. मराठ्यांनी तसेच सरकारने सावध व्हावे, असेही जरांगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT