Manoj Jarange Patil Discharge pudhari
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil Discharge: मनोज जरांगे पाटील यांना रूग्णालयातून डिस्चार्ज.. अंतरवाली नाही मग कोणत्या ठिकाणी जाणार?

मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Anirudha Sankpal

Manoj Jarange Patil Discharge: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जवळपास २० दिवसांच्या उपोषणानंतर त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रूग्णालयात अनेक दिवस उपचार सुरू होते. आता मात्र त्यांना रूग्णालयातून डिस्चार मिळाला आहे.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे जाणार नसून ते जालना जिल्ह्यातील महाकाळा अंकुशनगर येथील त्यांच्या घरी जाणार आहेत.

चलो मुंबई मोहीम तुर्तास स्थगित

मराठा आरक्षणासंदर्भातील कुणबी नोंदी अन् दिलेले दाखले रद्द करण्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलं होतं. राज्य सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र पाटोदा इथंपर्यंत पोहचल्यानंतर त्यांची प्रकृती जास्तच खालावली.

मात्र सरकारने देखील सकारात्मकता दाखवत पाटोदा येथे राज्य सरकारचे शिष्टमंडळ पाठवून चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सरकारला अजून थोडा वेळ देत आपली चलो मुंबई मोहीम तुर्तास स्थगित केली होती.

आता राज्यात कुठेही आंदोलन

यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजी नगर येथील रूग्णालयात हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचार सुरू असातना देखील मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आता पुढचं आंदोलन अंतरवाली सराटीत होईल असं नाही. दे राज्यात कुठेही होऊ शकते असे सांगितलं होतं.

आता पुढचं आंदोलन हे पाटोदापासून पुढे कुठेही होईल. ते मुंबईत होईल परळीत होईल किंवा येवल्यात देखील होईल असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे ठिकाण गुलदस्त्यात ठेवलं.

सरसकट नुकासन भरपाई द्या

मनोज जरांगे पाटील यांनी यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत देखील माहिती दिली. ते म्हणाले की यंदाचा दसरा मेळावा हा नारायण गडावर होणार आहे. काल बैठक झाली असून २० ऑक्टोबर रोजी दासरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला सर्वांनी यावे अशी देखील विनंती पाटील यांनी केली.

दुष्काळाबाबत देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून हेक्टरी १ लाखापर्यंत मदत देण्यात यावी अशी देखील मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT