Manoj Jarange Patil On OBC protest : "विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी बांधवांचा खरा घात केला आहे. भुजबळ आणि वाड्डेटीवर हे एकत्र झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात हैदराबाद गॅझेटनुसार असलेला जीआर रद्द करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा काढू द्या, काय होते, आतापर्यंत १६ टक्के आरक्षण मराठ्यांचा खाल्ले आहे. ते म्हणतील तसे होणार नाही. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट मान्य करण्याचा जीआर काढलेला आहे. आमची प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलेली आहे. कितीही बोलू द्या आरक्षणा धक्का लागणार नाही, " असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज (दि. ६) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. हैदराबाद गॅझेटचा जीआर (शासकीय आदेश) नियमानुसार निघाला आहे. कोणताही जीआर हा दबावात निघत नसतो. तसेच तो रद्द ही होत नसतो. भारतीय संविधानाच्या सर्व चौकटीत राहून काम करावे लागते, असेही ते म्हणाले.
या वेळी जरांगे म्हणाले की, "वडेट्टीवार यांनी वक्तव्यावर गरीब ओबीसी बांधवांनी चिंतन करावे. त्यांनी ३७४ जाती संपविल्या आहेत. त्यामुळे वड्डेटीवर यांच्यावर ओबीसी बांधवांनी विचार करावा. त्यांनीच ओबीसींचा खरा घात यांनी केला आहे. १६ टक्के मराठा आरक्षण असूनही ते दुसऱ्याला दिले गेले. आता ते आम्हाला ते माघारी मिळणार आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायचा आहे. आम्ही गोरगरीब ओबीसींना सांभाळतो जीव लावतो, ओबीसी यांना कुठलाही आमचा धाक नाही. स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी ओबीसींना संपविण्याचा काम केले आहे."
धनगर समाजाकडे नेतृत्व दिले पाहिजे, मात्र येवलावाल्याला दम निघेल का?, असा खोचक सवाल करत भुजबळ आणि वाड्डेटीवर हे एकत्र झाले आल्याची चर्चा ऐकायला मिळाली. कुठेतरी फॉर्म हाउसमध्ये चर्चा झाली. यासर्व प्रकारातून एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सावध राहावे. हे त्यांना संपवतील. हा माणूस जातीयवादाच्या दंगली लावू शकतो. भुजबळ जत्रेतील इस्तु आहेत. यापूर्वी परळी बाबत काय मत होत, धनगर समाजबाबत एक शब्द काढत नाहीत, असेही जरांगे म्हणाले.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मराठ्यांनी उभा केला. काही वर्षांपूर्वी राहुल गांधी हे जालन्यात आले होते. ते गुळाची ढेप पाहून. हे कुणाच्या झाडाला येतो, असे त्यांनी विचारले होते. त्यांना गूळ कसा तयार होते हेही माहित नाही. काँग्रेस सारखे पक्ष मराठ्यांनी मोठे करू नका. जात सोडून सर्व शेतकरी एकत्र या, असे आवाहनी जरांगे यांनी यावेळी केले.
हैदराबाद गॅझेटचा जीआर (शासकीय आदेश) नियमानुसार निघाला आहे. कोणताही जीआर हा दबावात निघत नसतो. तसेच तो रद्द ही होत नसतो. भारतीय संविधानाच्या सर्व चौकटीत राहून काम करावे लागते. १० तारखेला निघणाऱ्या काँग्रेसच्या मोर्च्यांना समजून घ्या, असेही जरांगे म्हणाले. बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
आमच्या शक्तीवर विश्वास आहे. सरकारने दिवाळीपर्यंत पूरग्रस्त शेतकर्यांना मदत दिली नाही तर आंदोलनासाठी बैठक होईल. शेतकऱ्यासाठी मराठा आरक्षणासारखाच टोकाचा अंतिम लढा उभा केला जाईल. तसा शेतकऱ्यासाठी एकदाच मोठ आंदोलन करून तुकडा पाडू, असा इशाराही त्यांनी राज्यसरकारला दिला.