Sambhajinagar News : एसबीआय बँकेकडे गहाण ठेवलेली १.८१ कोटींची मशिनरी परस्पर विकली file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : एसबीआय बँकेकडे गहाण ठेवलेली १.८१ कोटींची मशिनरी परस्पर विकली

बदनापूर येथील 'शिंदे सिल्क इंडस्ट्रिज'च्या संचालकाविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Machinery worth ₹1.81 crore, mortgaged to SBI, sold off without authorization

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा व्यवसाय विस्तारासाठी घेतलेल्या कर्जापोटी चा बँकेकडे गहाण ठेवलेली तब्बल १ कोटी ८१ लाखाची मशिनरी परस्पर विकून स्टेट बँक ऑफ त्रे इंडियाची १ कोटी ५ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चिकलठाणा शाखेचे उपव्यवस्थापक अमित काशीनाथ खांडेभराड (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मे. शिंदे सिल्क गी इंडस्ट्रिज ओपीसी प्रा. लि. आणि तिचे संचालक गणेश अरुण शिंदे (४०, रा. जालना) क्षा याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एसबीआयच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहत शाखेने १९ मे २०२२ रोजी वरुडी (ता. बदनापूर) येथील शिंदे सिल्क इंडस्ट्रिजला २ कोटी ८१ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या कर्जाच्या सुरक्षिततेसाठी कंपनीने खरेदी केलेली १.८१ कोटींची मशिनरी ३१ मे २०२२ रोजी रीतसर करार करून बँकेकडे गहाण ठेवली होती. बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय ही मशिनरी विकण्यास किंवा हलवण्यास मनाई होती.

मात्र, कर्जाचे हप्ते थकल्याने २९ डिसेंबर २०२५ रोजी खाते एनपीए झाले आणि बँकेचे १.०५ कोटी रुपये थकीत राहिले. दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी शाखा व्यवस्थापक सुयोग नगरदेवळेकर व अमित खांडेभराड यांनी वरुडी येथील युनिटची पाहणी केली असता, गहाण ठेवलेली मशिनरी गायब असल्याचे निदर्शनास आले.

विचारणा करताच शिंदे याने अधिकाऱ्यांना हाकलून दिले आणि युनिटला आतून कुलूप लावले. याप्रकरणी गुरुवारी (दि. १९) गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक भारत पाचोळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT