Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : घरमालकाने गर्भवती महिलेला दिला धक्का

जिन्यावरून पडल्याने गर्भपात : गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Landlord pushes pregnant woman; she falls down the stairs and suffers a miscarriage

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रूम खाली करण्याच्या कारणावरून भाडेकरू व घरमालकात झालेल्या वादात घरमालकाने भाडेकरू गर्भवती महिलेस धक्का दिला. या धक्क्यामुळे महिला जिन्यावरून खाली पडली. यात तिचा दोन महिन्यांचा गर्भपात झाला.

ही घटना १९ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत घडली. या प्रकरणी आयशा तांबोळी, सुमेरा तांबोळी, सोफीया तांबोळी, अरबाज तांबोळी (सर्व रा. सईदा कॉलनी) यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यास्मीन आरेफ पटेल (२८, रा. सईदा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पीडिता या पतीसह तांबोळी यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. १९ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घरात पाणी नसल्याने त्या घरमालक अब्दुल सलमान तांबोळी यांच्या तळमजल्यावरील घरात पाणी मागण्यासाठी गेल्या. त्यावेळी घरमालकाची पत्नी आयशा तांबोळी यांच्यासोबत रूम खाली करण्यावरून शाब्दिक चकमक उडाली.

यामुळे संतापलेल्या तांबोळी कुटुंबाने फिर्यादी यास्मीन यांना धक्काबुक्की केली. या झटापटीत यास्मीन या जिन्यावरून खाली कोसळून बेशुद्ध पडल्या. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात व त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जिन्यावरून पडल्यामुळे त्यांचा गर्भपात झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT