Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीच्या मित्रावर पतीचा जीवघेणा हल्ला

गळ्यावर चाकूने वार, डोक्यात घातला दगड; हडको भागातील स्वामी विवेकानंद गार्डन येथील थरारक घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर :पत्नीसोबत बागेत बसलेल्या तिच्या मित्रावर पतीने मागून येऊन चाकूने गळ्यावर वार केला. एवढ्यावरच न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रियकराच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना मंगळवारी (दि.२) सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास हडको भागातील स्वामी विवेकानंद उद्यानात घडली. या जीवघेण्या हल्ल्यात विष्णू बिभीषण आवाड (२७, रा. इंदापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

दरम्यान, सिडको पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी विष्णू आवाड आणि आरोपीची पत्नी हे दोघे फलटण येथील एका अकॅडमीमध्ये एकत्र असताना त्यांची ओळख झाली होती.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Pune Crime: पुण्यात 24 तासांत दोन खून, दोन खुनी हल्ले; शहरात भीतीचे वातावरण

मंगळवारी (दि.२) सकाळी विष्णू तिला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आला होता. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दोघे टीव्हीसेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डन येथे बोलत बसले होते.

अचानक आरोपी पतीने मागून येऊन धारदार चाकूने विष्णूच्या गळ्यावर उजव्या बाजूने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विष्णूने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त पतीने खाली पडलेला मोठा दगड उचलून विष्णूच्या डोक्यात घातला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar crime : शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर कुख्यात राम बोडखेचा खुनीहल्ला

तिनेच जखमीला रुग्णालयात नेले

गंभीर जखमी झालेल्या विष्णूला त्याच्या विवाहितेने रिक्षाने तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. विष्णूच्या गळ्याला गंभीर इजा झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पत्नीनेच पोलिसांना केला कॉल

त्या विवाहितेचा आरोपी पतीही रुग्णालय परिसरातच घुटमळत असल्याचे दिसताच पत्नीनेच डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. सिडको पोलिसांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी विष्णूचा भाऊ श्रीकृष्ण आवाड (३२) याच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news