Chhatrapati Sambhajinagar Accident | भरधाव ट्रक लॉजमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरच्या करोडी पुलाजवळ भीषण अपघात
  Accident News
Accident Newspudhari photo
Published on
Updated on

Dhule Solapur Highway Accident

छत्रपती संभाजीनगर : धुळे–सोलापूर महामार्गावरील छत्रपती संभाजीनगरच्या करोडी पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या दामोधरण लॉजमध्ये घुसला. या अपघातात ट्रकमधील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक लासूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत होता. ट्रकमध्ये सुमारे ३२ टन वॉशिंग पावडरचा माल भरलेला होता. करोडी पुलाजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक थेट दामोधरण लॉजमध्ये घुसला. अपघाताच्या वेळी लॉजमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

  Accident News
Sambhajinagar Woman Death | लग्नाला अवघे ७ दिवस, १५ वर्षांचा प्रेमसंघर्ष, नियतीचा क्रूर घाला, नवविवाहितेचा दुर्दैवी अंत

मात्र, ट्रक आणि लॉजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर चालक आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले होते. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news