सिल्लोड : बोलेरो जीप कार अपघातात १६ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि.१८) दुपारी - सिल्लोड-भोकरदन रस्त्यावरील भोकरदन हद्दीतील गारखेडा फाट्याजवळ घडला. जखमींतील ५ जणांवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले.
सय्यद रिजवान नशीब (२४, अजिंठा, ता. सिल्ल-ोड), प्रज्ञा विलास राऊत (३४, मालखेडा, ता. भोकरदन), आप्पासाहेब विठोबा खांडेभराड (७०, घोडेगाव, जि. जालना), संतोष नामदेव गायकवाड (३२, मुकपाठ, ता. सिल्लोड), सत्यभामा आप्पासाहेब खांडेभराड (६०), रुद्र सुखदेव खांडेभराड (११), लता बद्रिनारायण खांडेभराड (१८), प्रल्हाद कोंडीबा खांडेभराड (५५), ऋतिका बद्रीनारायण खांदेभराड (१०), रेवता मधुकर खांडेभराड (४०), गजानन दामोदर खांडेभराड (२९), मधुकर कोंडीबा खांडेभराड (५०), दामोदर कोंडीबा खांडेभराड (५५), रामेश्वर आप्पासाहेब खांडेभराड (२९), रावसाहेब भिकाजी खांडेभराड (४०) सर्व रा. घोडेगाव, जि. जालना, विठ्ठल भानुदास शेळके (३६, गोळेगाव, ता. सिल्लोड) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. यातील ५ जणांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे.
मारुती कार (एमएच ०४, ईडी ४४९०) सिल्लोडकडून राजूरला जात होती. तर या दरम्यान बोलेरो जीप (एमएच २१, व्ही १५६५) जालनाहून सिल्लोडकडे येत होती. या दोन्ही वाहनांची गारखेडा फाट्याजवळ धडक झाली. यात दोन्ही वाहनांमधील वरील १६ जण जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी धाव घेत जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले.
अपघातानंतर टायर फुटले
दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्यानंतर राजूरकडे जाणाऱ्या मारुती कारचे टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे कळते. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र नागरिक तातडीने मदतीला धावले.