जायकवाडी पाटबंधारेच्या निविदांमध्येही गोंधळच pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar tender scam : जायकवाडी पाटबंधारेच्या निविदांमध्येही गोंधळच

12 टक्के कमी दराला डावलून जास्त दराची निविदा स्वीकारली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर :जलसंपाद विभागाच्या लघु पाटबंधारे विभागाप्रमाणेच जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या निविदा प्रक्रियांमध्येही गोंधळच गोंधळ दिसून येत आहे. येथील अधिकार्‌‍यांनी सव्वा दोन कोटींच्या या निविदेत 12 टक्के कमी दराने निविदा दाखल करणार्‌‍या एजन्सीला अपात्र करून त्यापेक्षा 10 टक्के जास्त दर असलेल्या एजन्सीची निविदा काम देत शासनाला लाखोंचा भुर्दंड लावला आहे. विशेष म्हणजे डावललेल्या एजन्सीने तक्रार केल्यानंतरही त्याला केराची टोपली दाखवली.

जलसंपदा विभागाच्या प्रत्येक कामांच्या निविदा प्रक्रिया वादग््रास्तच आढळून येत आहे. केवळ राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असलेल्या ठेकेदारांनाच कामे मिळवून देण्याच सरकारी कार्यालये उरली का, असा सवाल निविदांमधील गोंधळावरून निर्माण होत आहे. कामांच्या निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, यासाठीच शासनाने अ ॉनलाईन निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसारच मागील काही वर्षांपासून निविदा अ ॉनलाईन मागविण्यात येत आहेत. परंतु, असे असतानाही अधिकार्‌‍यांच्या आशीर्वादाने मर्जीतील ठेकेदारांनाच काम दिले जात आहे. त्याचे अनेक उदाहरणे पुढारीने मागील भागांमध्ये पुराव्यांसह सविस्तर वृत्तांद्वारे मांडले आहेत.

लघु पाटबंधारेप्रमाणेच जायकवाडी पाटबंधारेतही मर्जीतील ठेकेदारांसाठी अधिकारी वाटेल ती कारणे पुढे करून पात्र ठरणार्‌‍या एजन्सींच्या निविदा रद्द करीत असल्याचा प्रकार नुकत्याच राबविलेल्या निविदा प्रक्रियेत पुढे आला आहे. या विभागाने 18 अ ॉगस्ट 2025 मध्ये मातोश्री पाणी वापर संस्थेसाठी निविदा प्रक्रिया राबविली.

सुमारे अडीच कोटी रुपयांच्या या कामासाठी 5 एजन्सींनी निविदा दाखल केल्या होत्या. परंतु, यात 12 टक्के कमी दराने निविदा दाखल करणार्‌‍य श्रीराम कन्स्ट्रक्शनला तपशीलवार निविदा सूचनानुसार संपूर्ण अभिलेखे वाचनायोग्य नाहीत, असे कारण देत डावलले. अन्‌‍ त्यापेक्षा दहा टक्के जास्त दराने निविदा दाखल करणार्‌‍या एस.जी. देवीदान इन्फा एजन्सीला काम देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अभिलेख्यांसाठी वेळही दिला नाही

एखाद्या एजन्सीने निविदा प्रक्रियेपेक्षा सर्वात कमी दाराने काम करण्याची तयारी दर्शविली. तर त्या एजन्सीला काम दिल्यास शासनाच्या निधीची बचत होते. परंतु, अधिकार्‌‍यांना शासनाचा निधी वाचविण्यात नव्हे तर मर्जीतील ठेकेदाराला काम कसे मिळेल, हे अधिक महत्त्वाचे वाटते. कदाचित त्यामुळेच श्रीराम कन्स्ट्रक्शनला स्पष्ट दिसणारे अभिलेखे दाखल करण्यासाठी वेळ दिला नसावा, अशी देखील काही ठेकेदारांमध्ये चर्चा.

अनेक निविदा संशयास्पद

या विभागांकडून राबविण्यात आलेल्या विविध कामांच्या निविदांमध्ये असेच संशयास्पद प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे या विभागाच्या प्रत्येक निविदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT