Sambhajinagar News : दुसऱ्या पत्नीचा मुलगा म्हणून 'अनुकंपा'त नोकरी नाकारणे अयोग्य Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दुसऱ्या पत्नीचा मुलगा म्हणून 'अनुकंपा'त नोकरी नाकारणे अयोग्य

खंडपीठाचा निर्णय; याचिकाकर्त्याचा अनुकंपा नियुक्तीसाठी विचार करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

It is wrong to refuse a job in 'Anukampa' as the son of another wife

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुसऱ्या पत्नीचा मुलगा म्हणून अनुकंपा तत्त्वावरील नोकरी नाकारणे अयोग्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांनी दिला. याचिकाकर्त्याचा अनुकंपा नियुक्तीसाठी विचार करण्याचे निर्देशही खंडपीठाने प्रशासनाला दिले आहेत.

सुनावणीवेळी शासनाच्या अनुकंपा योजनेमध्ये 'दत्तक मुलाला' नोकरीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दत्तक मुलाचा वडिलांशी कोणताही रक्ताचा संबंध नसतो. याउलट, दुसऱ्या पत्नीचा मुलगा हा वडिलांचा थेट रक्ताचा नातेवाईक असतो. त्यामुळे दत्तक मुलाच्या तुलनेत दुसऱ्या पत्नीच्या अपत्यास अनुकंपा नियुक्तीचा दावा हा अधिक सरस आणि नैसर्गिक आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील अॅड. अजिंक्य रेड्डी यांच्याकडून करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या 'मुकेश कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया' या न्यायनिवाड्याचा संदर्भ देण्यात आला.

या प्रकरणातील याचिकाकर्त्याच्या वडिलांचे २०१८ मध्ये निधन झाले. ते 'नेहरू युवा केंद्रा'मध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी गणेशने अनुकंपा नियुक्तीसाठी रीतसर अर्ज दाखल केला होता. मात्र गणेश हा 'दुसऱ्या पत्नीचा मुलगा' आहे, या केवळ एकाच कारणावरून प्रशासनाने त्याचा अर्ज प्रलंबित ठेवला होता, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

प्रतिवादींच्या वतीने सांगण्यात आले की, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील सहा महिन्यांत हे नियम निश्चित केले जातील. त्यानंतर स्थगित ठेवण्यात आलेल्या याचिककर्त्यासह इतर प्रकरणांचा विचार त्या नियमांनुसार करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT