Fraud Case : व्हॉट्सॲप मेसेजद्वारे इन्फिनिटी गॅसेस कंपनीला २० लाखांचा गंडा

अदालत रोडवरील 'इन्फिनिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत ही घटना घडली आहे.
sambhajinagar news
Fraud Case : व्हॉट्सॲप मेसेजद्वारे इन्फिनिटी गॅसेस कंपनीला २० लाखांचा गंडाFile Photo
Published on
Updated on

Fraud Case: 20 lakhs fraud to Infinity Gases Company through WhatsApp message

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअॅप डीपीला ठेवून, मालकच बोलत असल्याचे भासवून बनावट संदेशाद्वारे अकाऊंटंटला तब्बल २० लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडून ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अदालत रोडवरील 'इन्फिनिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar news
Baby Cobra Rescue : बेडकाच्या तावडीतून बेबी कोब्राची सुटका

फिर्यादी चिदेश हर्षवर्धन जैन (५१, रा. गिरनार कॉम्प्लेक्स, अदालत रोड) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंपनीत भीमराव संभाजी म्हस्के हे गेल्या १५ वर्षांपासून अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत आणि कंपनीचे आर्थिक व्यवहार तेच पाहतात. जैन हे २६ जुलै रोजी त्यांच्या कंपनीतील पार्टनर शैलेश पटेल यांच्यासोबत कामानिमित्त बंगळूरला गेले होते व २९ जुलै रोजी परत आले.

२९ जुलै रोजी सकाळी जैन कार्यालयात असताना, अकाऊंटंट म्हस्के हे एका आरटीजीएस फॉर्मवर त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी आले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी २० लाख रुपये आरटीजीएस करण्यासाठी फॉर्म भरला आहे, असे म्हस्के यांनी सांगताच जैन यांना धक्का बसला. मी तर असे काहीच सांगितले नाही, असे जैन यांनी स्पष्ट केले.

sambhajinagar news
Balasaheb Thackeray : १५ कोटींच्या निधीने बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाला गती

तेव्हा म्हस्के यांनी जैन यांना त्यांच्या ऑफिसच्या मोबाईल क्रमांकावर आलेले व्हॉट्सअॅप मेसेज दाखवले. त्यात सायबर भामट्याने २७ जुलै रोजी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान म्हस्के यांना मेसेज केले होते. या भामट्याने आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर मालक चिदेश जैन यांचा फोटो लावला होता. त्याने मेसेजमध्ये 'तुम्ही ऑफिसमध्ये आहे का? कंपनीच्या खात्यातील बॅलन्स चेक करा आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यावर ३० लाख रुपये पाठवा, पैसे पाठवल्यावर मला स्क्रिनशॉट टाका, असे सांगण्यान आले.

त्यानंतर लगेचच पुन्हा रक्कम २० लाख रुप करा आणि तात्काळ ट्रान्सफर करा,' अशी खोटी सूचन केली होती. मालकाचाच फोटो असल्याने व आदेश मालकाचाच असल्याचे समजून म्हस्के यांनी २७ जुत रोजीच आरटीजीएसद्वारे २० लाख रुपये भामट्याच्य खात्यावर ट्रान्सफर केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जैन यांनी सायबर पोलिसांन धाव घेतली.

सायबर फसवणुकीचा नवा फंडा : वेदांतनगर पोलिसांत गुन्हा दाखल

सायबर पोलिसांनी साडेचार लाख रुपये केले होल्ड

या प्रकरणी सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित खात्यावरील साडेचार लाख रुपये 'होल्ड' केले आहेत. हे पैसे फिर्यादीला परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो वेदांतनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रोयलावार करत आहेत.

पडताळणी न करता पाठवली रक्कम

जैन हे बंगळूरला मिटिंगसाठी गेले होते. त्यांचाच फोटो असलेल्या एका नंबरवरून पैसे ट्रान्स्फरचा मेसेज आल्याने म्हस्के यांनी कॉल करून पडताळणी न करता पैसे भामट्याला पाठवून दिले. विशेष म्हणजे संबंधित बँकेनेही एवढ्या मोठ्या रकमेचे आरटीजीएस असताना खातेदाराला कॉल करून पडताळणी केली नाही. ही फसवणुकीची रक्कम अन्य राज्यातील बँक खात्यात गेलेली आहे. त्यामुळे जैन यांची माहिती आरोपींनी कशी मिळवली याचाही तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news