QR scam : दोन हजार कोटींच्या क्यूआर घोटाळ्याची चौकशी गुलदस्त्यात File Photo
छत्रपती संभाजीनगर

QR scam : दोन हजार कोटींच्या क्यूआर घोटाळ्याची चौकशी गुलदस्त्यात

महिना उलटूनही अहवाल तयार होईना; बोगसगिरी करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न ?

पुढारी वृत्तसेवा

Investigation into the ₹2,000-crore QR scam remains shrouded in secrecy

अमित मोरे

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा नियोजन समितीने (डीपीडीसी) मंजूर केलेल्या कामांची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबवली जाते. मात्र, यातील अनेक कामांमध्ये नाव एकाचे अन् क्यूआर कोड दुसऱ्याचा असे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत.

या बोगसगिरीची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी चौकशी समिती नियुक्त करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र, महिनाभराची मुदत संपूनही अद्याप अहवाल तयार झाला नसल्याने, २ हजार कोटींचा हा क्यूआर घोटाळा दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

जिल्हा नियोजन समितीतून मंजूर होणाऱ्या कामांची सखोल चौकशी होत नसल्याने अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणावर पोळ केला जातो. यामध्ये बहुतांश वेळा संबंधित मतदारसंघांच्या आमदारांचाही हस्तक्षेप असतो. काम एकाच्या नावाचे अन् क्यूआर कोड दुसन्याचा हा प्रकार दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा नियोजन अभिकारी भारत यायाळ यांच्या निदर्शनास आला होता. बिलांची पडताळणी करताना हा घोळ आढळल्यानंतर अनेक संचिकांचे क्यूआर कोड तपासण्यात आले.

हा प्रकार जिल्हाधिका-यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना सांगितल्यानंतर, पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. मात्र, तेव्हापासूनच हे प्रकरण दडपण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. शेकड़ो कोटींच्या कामांना दरवर्षी प्रशासकीय मान्यता दिली जाते, तरीही या गंभीर घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यात बढ्या अधिकायांसह नेत्यांचा सहभाग आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मनपा हद्दीतील कामांत डबल गेम ?

महापालिका हद्दीत अनेक कामे राज्य शासन, स्मार्ट सिटीच्या निधीतून झाली. यासाठी सुमारे हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, यातील काही काने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झाल्याचे दारववण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील कामांच्या वा डबल गेमचीही चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या कामांना महापालिकेने एनओसी दिली, तो काम त्यापूर्वी मनपाच्या निधीतून झाली होती का, याबाही शोध घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT