शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ file photo
छत्रपती संभाजीनगर

शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

येथील शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ आ. अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (दि.२२) झाला.

पुढारी वृत्तसेवा

Inauguration of Government Gram Procurement Center

फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : येथील शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ आ. अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (दि.२२) झाला. हा शुभारंभ खुलताबाद रस्त्यावरील वानेगाव फाट्याज-वळील गोडाऊनमध्ये झाला.

एन.सी.सी.एफ. ही केंद्र शासनाची संस्था आहे. येथील आजिंठा खोरे वुमन फार्मस प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदी होणार आहे. खरेदीचा अहवाल शासनास पोहोचला की, आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदे-शाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, जि.प.उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, देवगिरी साखर कारखाना चेअरमन कल्याण चव्हाण, पं स. समिती सभापती सर्जेराव मेटे, जि.प. सदस्य गोपाळ वाघ, निखिल चव्हाण या?ची उपस्थित होती. सुत्रसंचालन कृषी विभागाचे मंकरद नन्नावरे यांनी केले.

जि.प.चे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी जि. प योजनांत फुलंब्री विधानसभा मतदार संघास झुकते माफ द्यावे त्यांना वीस वर्षांचा जि.प. अनुभव आहे असे आ. अन-राधा चव्हाण यांनी सांगितले. यावेळी पं.स.सदस्य बाळासाहेब तांदळे, सुनिता कोलते, पंडितराव जाधव, कल्याण चव्हाण, संतोष तांदळे, अनंत चव्हाण, सचिन चव्हाण, अरूण गाडेकर, विलास अटुळे हसन देशमुख, ईलायास शाह यांची उपस्थिती होती.

आद्रतेनुसार खरेदी

हरभरऱ्यास शासनाचा ५८७५ रुपये प्रति क्विंटल भाव असणार आहे. खरेदी वेळी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद असणे, बँक पासबुक, आधार कार्ड देणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर मँसेज येईल त्यावेळेस शेतकऱ्यांनी हरभरा घेऊन यावा आद्रतेनुसार नुसार खरेदी होणार आहे यासाठी आपला हरभरा माल वाळवून आणावा, असे सांगण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT