In view of the municipal elections, the police conducted a march in the Jinnsi and City Chowk areas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार, रविवारी (दि.४) जिन्सी आणि सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च (पथसंचलन) काढण्यात आला.
दंगा काबू पथकासह वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर या रूट मार्चमध्ये पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, शीघ्र कृती दल आणि दंगा काबू पथकाचा समावेश होता.
दोन्ही पोलिस ठाण्याचे निरीक्षक, अधिकारी आणि मोठ्या संख्येने अंमलदार या संचलनात सहभागी झाले होते. जिन्सी आणि सिटी चौक भागातील प्रमुख रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणावरून हे पथसंचलन करण्यात आले.