Muncipal Election : शिवसेनेच्या माजी महापौर ओझासह उपजिल्हाप्रमुख भाजपात

मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेत प्रवेश, पदाधिकाऱ्यांसह युवकांचा समावेश
Muncipal Election
Muncipal Election : शिवसेनेच्या माजी महापौर ओझासह उपजिल्हाप्रमुख भाजपातFile Photo
Published on
Updated on

Former Shiv Sena mayor Ojha and the deputy district chief join BJP

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उबाठाच्या माजी महापौर कला ओझा, माजी सभागृह नेते तथा उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, संतोष मरमठ यांनी रविवारी (दि.४) ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होताच भाजपने सेनेला जोरदार धक्का दिला आहे. या प्रवेशात मोठ्याप्रमाणात महिला व तरुण कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Muncipal Election
NCP News : प्रचारापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत कुरबुरी

यावेळी खासदार डॉ. भगवत कराड, आमदार संजय केणेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे, राजू वैद्य, समीर राजुरकर आणि हर्षवर्धन कराड, महिलामोर्चा अध्यक्षा उज्वलाताई दहिफळे, संजय गव्हाणे, ईश्वर पवार, संजय बोराडे, प्रमोद राठोड, सुरेखा गायकवाड, बाबासाहेब मुंडे, सत्यभामा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपमध्ये इतर पक्षातून इनकमिंग सुरूच असल्याने पक्षाची ताकद वाढतच आहे. ठाकरे सेनेतून नेत्यांसोबतच अॅड. दीपक क्षिरसागर, करण मिसाळ, अनिल मुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या विचारध-ारेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पार पडला.

Muncipal Election
Municipal Election : फडणवीस, योगी, ठाकरे, पवार, ओवैसींची तोफ धडाडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम प्रशासनाला आणि भाजपाच्या राष्ट्र प्रथम या विचारधारेला मान्यता देत पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे शहरातील काही प्रभागात आता ठाकरे सेनेची अडचण होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजयुमोचा एकजुटीने प्रचाराचा निर्धार

भाजप युवा मोर्चाची बैठक मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी संघटनात्मक काम, प्रचाराची दिशा आणि युवकांचा सक्रिय सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली. भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रचार कार्यालयांचे उद्घाटन

शहरातील प्रभाग क्रमांक १८,१९,२३, २७ येथील भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवारांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news