Muncipal Election : मतदानाच्या दिवशी वीज पुरवठा अखंडित ठेवा

मुख्य निवडणूक निरीक्षक मुगदल यांचे आदेश; तक्रारीनंतर ईव्हीएम, मनुष्यबळ बदला
Muncipal Election
Muncipal Election : मतदानाच्या दिवशी वीज पुरवठा अखंडित ठेवाFile Photo
Published on
Updated on

Maintain uninterrupted power supply on polling day

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी कुठल्याही परिस्थितीत मतदान केंद्र आणि शहराचा वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. तसेच कोणत्याही मतदान केंद्रावर ईव्हीएम किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार प्राप्त होताच तडकाफडकी बदलण्यात यावेत, असे निर्देश रविवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या मतदानपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत मुख्य निवडणूक निरीक्षक अश्विन मुगदत यांनी दिले.

Muncipal Election
Municipal Election : फडणवीस, योगी, ठाकरे, पवार, ओवैसींची तोफ धडाडणार

यावेळी महापालिका प्रशासक तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, विभागीय सहआयुक्त अनंद गव्हाणे, पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, रणजीत पाटील, उपजिल्हाधिकारी विजय राऊत, प्रविण फुलारी, उपायुक्त नंदकिशोर भोंबे, अंकुश पांढरे पाटील, लखीचंद चव्हाण, पोलिस उपायुक्तांसह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपस्थिती होती.

महापालिका निवडणूकीच्या कामाचा आढावा घेतांना मुदगल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मतदानाच्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्यास मतदान प्रक्रियेवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वीज वितरणाशी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करावा.

Muncipal Election
Muncipal Election : शिवसेनेच्या माजी महापौर ओझासह उपजिल्हाप्रमुख भाजपात

तसेच मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन नादुरुस्त होणे, मतदान अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या संथगतीमुळे मतदारांच्या रांगा लागणे, धिम्या गतीने प्रक्रिया सुरूच ठेवेण, याबाबतच्या तक्रारी निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या. तर त्वरीत या तक्रारींची दखल घेत पर्यायी ईव्हीएम किंवा मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

संवेदनशील केंद्रांवर लक्ष

संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, उपलब्ध मूलभूत सुविधा, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच मतदार जनजागृतीबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयुक्त जी. श्रीकांत यांनी मतदान तयारीसंदर्भातील सर्व बाबींची तपशीलवार माहिती मुख्य निवडणूक निरीक्षकांना सादर केली.

ड्रोनद्वारे ठेवणार लक्ष

शहरात लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. आता महापालिका निवडणुकीसाठीही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक घटना घडामोडींवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येईल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध ड्रोनद्वारे निरी-क्षणासोबतच आवश्यक त्या ठिकाणी घोषणा (अनाऊन्समेंट) करणेही शक्य होणार आहे, असेही पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news