निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांचे वरपर्यंत लागेबांधे File Photo
छत्रपती संभाजीनगर

Shendra MIDC News : निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांचे वरपर्यंत लागेबांधे

एमआयडीसीचे जबाबदार अधिकारी हतबल

पुढारी वृत्तसेवा

In the five-star Shendra MIDC, most of the works, be it roads or streetlights, have become substandard and bogus.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत रस्ते असो की पथदिवे, बहुतांश कामे निकृष्ट आणि बोगस केल्याने या फाईव्ह स्टार औद्योगिक वसाहतीची पुरती वाट लागली आहे. सेटिंग करून काम मिळवायचे, ते निकृष्ट करायचे आणि ओरड झालीच तर पुन्हा थातूर-मातूर मलमपट्टी करायची, काहीही फरक पडत नाही, असा कारभार सुरू असून, अधिकाऱ्यांनी जास्त त्रास दिलाच तर वरून दबाव आणण्यापर्यंत ठेकेदारांचे लागेबांधे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे जबाबदार अधिकारीही हतबल झालेले आहेत. बोगस कामांचे पितळ उघड्या डोळ्यांनी दिसत असताना फक्त कागदोपत्री नोटीस पलीकडे कारवाईसाठी अधिकाऱ्यांचे हात धजावत नसल्याने ठेकेदारांची मुजोरी वाढली आहे.

शहरासह मराठवाड्याच्या औद्योगिक प्रगतीची नवी दारे खुली करणाऱ्या शेंद्रा एमआयडीसीमधील कोट्यवधींच्या निधीतील रस्ते निकृष्ट कामांमुळे काही महिन्यांतच उखडून गेले आहेत. या औद्यागिक वसाहतीमधील एओपीक्युआर या रस्त्याचे तब्बल ८ कोटी ६७ लाख ९४ हजारांच्या निधीतून गतवर्षी रुंदीकरण आणि मजबुतीकरण केले.

तर रेडिको कंपनीसमोरील डी ब्लॉकमधील रस्त्याचे तब्बल ५ कोटी, १३ लाख १६ हजार ०७ रुपयांच्या निधीतून मे. मापारी इन्फो. यांनी डांबरीकरण केले होते. मात्र काही महिन्यांतच या रस्त्यांची वाताहत होऊन ठिकठिकाणी मोठमोठी खड्डे पडली. निकृष्ट कामामुळे या रस्त्यांचा अक्षरशः धुराडा झाल्याचे दै. पुढारीने समोर आणले. त्याची दखल घेत प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस बजावल्याने एओपीक्यूआर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.

मात्र डी ब्लॉकमधील या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम एक दिवस करून तसेच अर्धवट सोडले आहे. चार दिवस होऊनही काम अर्धवट थांबल्याने एमआयडीसीकडून संपर्क करूनही ठेकेदार फोन घेत नसल्याने हतबल अधिकाऱ्यांकडून परत एकदा नोटीस बजावण्याची तयारी सुरू आहे. मात्र वरून दवाब आणण्यापर्यंत मजल पोहोचलेल्या ठेकदारांना कुठल्याही कारवाईचे भय नाही. त्यामुळे एमआयडीसीत बहुतांश कामे ही बोगस आणि निकृष्ट करण्याचा खेळ बिनबोभाटपणे सुरू आहे.

अशा ठेकेदाराना ब्लॅकलिस्ट करावे निकृष्ट आणि बोगस कामे करणाऱ्यांना ठेकेदारांबाबत एमआयडीसी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. नोटीस बजावल्यानंतरही कामे केली नाही तर ठेकेदारांना सरळ ब्लॅकलिस्ट करावे.
-अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ

एमआयडीसीचे रस्ते खड्ड्यानी भरले संजय शिरसाटएमआयडीसीमधील प्रमुख मार्गासह बहुतांश अंतर्गत रस्त्यांचीही दयनीय दुरवस्था झालेली आहे. मुख्य औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या अनेक ठिकाणी हे रस्ते अक्षरशः खड्यांनी भरले असून, लहान-मोठ्या अपघातांचे कारण ठरत आहे. या औद्योगिकनगरीत दररोज हजारो वाहने ये-जा करतात. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना दचके बसत आहेम. दुर्घटनेपूर्वी रस्त्यांची कामे व्हावीत, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.

पथदिवेही लावले कागदोपत्री

एमआयडीसीतील पथदिव्यांचीच दुरवस्था झाल्याने प्रमुख मार्ग सोडले तर बहुतांश रस्त्यांवर अंधार पसरलेला आहे. पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखोंचे कंत्राट देऊनही नुसतेच कागदोपत्री दिवे लावले जाते. आधीच्या असंसो लाईटसनेही तेच केले आणि आताच्या बिटा इलेक्ट्रिकलकडूनही हात खेळ सुरू आहे. यावरही ठेकेदारांवर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने उद्योजकांकडून संताप व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT