छत्रपती संभाजीनगर : आदर्श पतसंस्थेत गोरगरीब, वयोवृद्ध ठेवीदारांच्या ठेवी तीन वर्षांपासून अडकून पडल्या आहेत. या प्रकरणाला गती मिळावी आणि ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन करणार असल्याचे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (दि.२६) सांगितले. यानंतरही कारवाई न झाल्यास थेट मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आदर्श पतसंस्थेतील ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी तीन वर्षांपासून अडकून पडल्या आहेत. त्यामुळे त्रस्त ठेवीदारांसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याची घोषणा जलील यांनी शुक्रवारी सुभेदारी विश्रामगृह येथे केली. यावेळी ठेवीदारांनी जलील यांना भगवी टोपी आणि भगवी शाल घातली. जलील म्हणाले, या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात व्हावी, अशी प्रमुख मागणी सोमवारी करण्यात येणार आहे.
संथ गतीमुळे या घोटाळ्यातील ७५ ठेवीदारांचा जीव गेला आहे. यासाठी प्रशासनातील निष्क्रियता जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमो मोठे आंदोलन करण्यात येईल. त्यानंत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तहसीलदारांक प्रलंबित असलेली यासोबतची प्रकरण निकाली काढण्याची मागणी केली जाणा आहे.
त्या खासदारावर कारवाई व्हायला पाहिजे
यावेळी खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरही टीका करत सर्वांसाठी समान न्यायाची अपेक्षा जलील यांनी व्यक्त केली. हा खासदार कॅमेऱ्यासमोर धमकी देतो. ते सत्तेत असल्याने कुठलीच भीती नाही. त्या खासदारावर कारवाई व्हायला पाहिजे.