English-medium schools : इंग्रजी शाळांना स्वतंत्र एसओपी आणि संरक्षण कायदा लागू करा file photo
छत्रपती संभाजीनगर

English-medium schools : इंग्रजी शाळांना स्वतंत्र एसओपी आणि संरक्षण कायदा लागू करा

इंग्लिश स्कूल्स महासंघ घेणार राज्यस्तरीय परिषद

पुढारी वृत्तसेवा

Implement a separate SOP and protection law for English-medium schools

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इंग्लिश स्कूल्स महासंघाच्या वतीने बीड बायपास परिसरातील एलोरा इंग्लिश स्कूलमध्ये नुकतीच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश सहसचिव रत्नाकर फाळके यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

या बैठकीत शाळांच्या विविध समस्यांवर चर्चा करून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत करमाड येथील फिनिक्स शाळेवर एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) केलेल्या ड कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. 1 विनाअनुदानित शाळांचे कर्मचारी 'लोकसेवक' ने कक्षेत येत नसतानाही कारवाई झाल्याने न्यायालयाने ती चुकीची ठरवली.

याप्रकरणी महासंघ संबंधित शाळेला डे कायदेशीर पाठबळ देणार आहे. बैठकीचे संचलन राजेश निंबकर यांनी केले, तर डॉ. गजानन नालमवार न यांनी आभार मानले. बैठकीस जिल्हाध्यक्ष भगवान पवार, योगेश अंभोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख मागण्याः इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र एस.ओ.पी. व शाळा संरक्षण कायदा लागू करावा, पालकांनी वर्षाअखेर थकीत शुल्क न भरल्यास प्रवेश रद्द व वसुलीचे अधिकार देणारे परिपत्रक काढावे, विना टीसी प्रवेशास प्रतिबंध असावा, आरटीई प्रतिपूर्ती प्रतिविद्यार्थी ३५ हजार रुपये करावी आणि गणवेश-दप्तराचे पैसे थेट पालकांच्या खात्यात जमा करावेत, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरटीई थकीत रक्कम चार आठवड्यांत द्यावी या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT