Cosmetic Surgery बेस्ट लूकसाठी कॉस्मेटिक सर्जरीला प्रचंड डिमांड File Photo
छत्रपती संभाजीनगर

Cosmetic Surgery : बेस्ट लूकसाठी कॉस्मेटिक सर्जरीला प्रचंड डिमांड

३० टक्के प्रमाण वाढले : नाक, भुवया, ओठांना आकर्षक रूप : गालावरची खळीही कृत्रिम

पुढारी वृत्तसेवा

Huge demand for cosmetic surgery for the best look

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर : आपण सुंदर आणि तरुण दिसावे, असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी अनेक जण मग शरीराच्या देखाव्यातही बदल करतात. कुणी नाकाला, भुवयांना तर कुणी ओठांना आकर्षक रूप देतो.

गालावरची खळीही कृत्रिमरीत्या बनवता येते. यालाच कॉस्मेटिक सर्जरी म्हणतात. सौंदर्य वाढवण्यासाठी अलीकडच्या काळात कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्यांचे प्रमाण तब्बल २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. दरवर्षी १५ जुलै हा दिवस जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. प्लास्टिक सर्जरीबाबत असलेले गैरसमज दूर करून जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे.

प्लास्टिक सर्जरीचे पुनर्रचनात्मक सर्जरी आणि शस्त्रक्रिया असे दोन प्रमुख प्रकार आहेत. यात पुनर्रचनात्मक सर्जरीमध्ये सामान्यतः जन्मजात फाटलेले ओठ आणि टाळू, जोडलेले बोट वेगळे करणे, जन्मचिन्हे काढून टाकणे यासह गंभीर भाजणे, अपघात किंवा दुखापतीमुळे विकृत रूप किंवा चट्टे दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया असतात.

याचे प्रमाण सुमारे ८० टक्के आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षात कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आधी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्री, अभिनेतेच कॉस्मेटिक सर्जरी करायचे. आता सोशल मीडियाच्या जमान्यात उच्चवर्गीयांसह सामान्य कुटुंबातील किशोरवयीन मुली-मुलेच नव्हे तर वृद्धापकाळाकडे झुकत अस-लेले अनेक ज्येष्ठ लोकही कॉस्मेटिक सर्जरीकडे आकर्षित होत आहे. मात्र प्रमाणाबाहेर किंवा अतिकॉस्मेटिक सर्जरीत अनेक धोकेही असल्याने प्लास्टिक सर्जनचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुनर्रचनात्मक सर्जरी आवश्यक

फाटलेले ओठ आणि टाळू, जोडलेले बोट वेगळे करणे, जन्मचिन्हे काढून टाकणे यासह गंभीर भाजणे, अपघात किंवा दुखापतीमुळे तसेच आजारामुळे आलेले विकृत रूप किंवा चट्टे दुरुस्त करण्यासाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया असतात.
डॉ. मंगेश तांदळे, सचिव, जिल्हा प्लास्टिक सर्जरी असोसिएशन.

कॉस्मेटिक सर्जरीचे प्रमाण वाढले

प्लास्टिक सर्जरीबाबत जनजागृती वाढली आहे. यासह चेहऱ्यावरील छोटे-छोटे व्यंग लपवण्यासोबतच नाक, जबडा तसेच चरबी कमी करणे, बोटॉकॉक्स आणि लेझर यासह विविध कॉस्मेटिक सर्जरीचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
डॉ. अनुराधा यादव, प्लास्टिक सर्जन.

इथिक्स सांभाळूनच सर्जरीचा सल्ला

अलीकडे सौंदर्य प्रसाधने वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आपण सुंदर आणि तरुण दिसावे यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. मात्र आम्ही सेफझोन आणि इथिक्स सांभाळून आवश्यक त्यांनाच कॉस्मेटिक सर्जरीचा सल्ला देतो.
डॉ. जितेन कुलकर्णी, अध्यक्ष, राज्य प्लास्टिक सर्जरी असोसिएशन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT