HSRP: 3 lakh 21 thousand vehicle owners are far away
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हाय सिक्यूरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी.) बसवण्यासाठी वाहनधारकांच्या हाती केवळ एक दिवस उरला आहे. तरीही अद्याप सुमारे ३ लाख २१ हजार ३४ वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणीही केली नसल्याने या वाहनांना एकच दिवसात नंबर प्लेटसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
३० नॉव्हेंबरनंतर ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली होती. या एक महिन्याच्या काळात केवळ ४० हजार नंबर प्लेट बसवल्याची नोंद आहे. २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ डिसेंबर-२०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी) बसवून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. आजपर्यंत सुमारे ३ लाख ७८ हजार ९६६ वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
त्यापैकी ३ लाख २७ हजार २२१ वाहनांना या नंबर प्लेट NB1118 बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०१९ पूर्वीची सुमारे ७लाख वाहने आहेत. आजही सुमारे ३ लाख २१ हजार ३४ वाहनध-ारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली नाही. उरलेल्या १ दिवसात या सर्व वाहनधारकांना नोंदणी करणे आवश्यक आहे. अन्यथा आरटीओच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मुदतवाढीकडे लक्ष
अद्यापही तीन लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणीच केली नसल्याने त्यांना मुदतवाढीची अपेक्षा आहे. तर शासनाच्या वतीने आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देऊनही वाहनध-ारक गंभीर नसल्याने आता मुदतवाढ मिळेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
... तर आठ महिने लागतील
एक महिन्याची मुदतवाढ दिल्यानंतर केवळ ४० हजार वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवल्या आहेत. याच वेगाने हे काम सुरू राहिल्यास जिल्ह्यातील वाहनधारकांना आणखी ८ महिने लागणार आहेत. यात वेग वाढवाला तरीही याला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आकडेवारीवरून सिद्ध होते.