

37,000 farmers in the region will benefit from solar agricultural pumps
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
: ज्या शेतकऱ्यांकडे महावितरणचे वीज कनेक्शन नाही अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर ऊर्जा कृषिपंप योजनेचा लाभदेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात आजघडीला ३७ हजार पंप बसवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत सर्वात जास्त लाभघेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जालना जिल्ह्यातील आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे महावितरणचे कनेक्शन नाही, अशा शेतकऱ्यांना सौर कृषिपंप योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी मोठा प्रतिसाद देत आहेत.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याचा समावेश आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या क्षमतेनुसार ३ एचपी, ५ आणि ७.५ एचपीचे सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. त्यानुसार या योजनेअंतर्गत सर्वात जास्त जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यात तब्बल २३ हजार १६४ पंप बसवण्यात आले आहेत.
तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३ हजार ९०९ पंप बसवण्यात आले आहेत. सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होत असल्याने या योजन-`ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान याचा लाभ लवकरात लवकर मिळावा म्हणून या योजनेअंतर्गत कामाला वेगही देण्यात आला आहे.
मागेल त्याला सौर कृषिपंप
या योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३७ हजार पंप बसवण्यात आले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३ हजार ९०९ व जालना जिल्ह्यात २३ हजार १६४ पंप बसवण्यात आले आहेत.