Honeybee Attack : अजिंठा लेणीत मधमाशांचा हल्ला; १० पर्यटक जखमी file photo
छत्रपती संभाजीनगर

Honeybee Attack : अजिंठा लेणीत मधमाशांचा हल्ला; १० पर्यटक जखमी

दोन महिन्यांत नववी घटना; लेणी क्र. ४ चे मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद

पुढारी वृत्तसेवा

Honeybee Attack at Ajanta Caves; 10 Tourists Injured

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा :

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना शनिवारी (दि.११) दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा पर्यटकांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. लेणी क्र. २६ व गार्डन परिसरात अचानक झालेल्या या हल्ल्यात सुमारे १० पर्यटक जखमी झाले असून, गेल्या दोन महिन्यांतील ही नववी घटना ठरली आहे.

दुपारपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू असताना सुमारे २ वाजेच्या सुमारास मधमाशांनी अचानक आक्रमक रूप धारण करत पर्यटकांवर झडप घातली. अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. स्वतःचा बचाव करण्यासाठी पर्यटक सुरक्षित स्थळी धाव घेऊ लागले; मात्र तोपर्यंत मधमाशांनी सुमारे १० जणांना चावा घेऊन जखमी केले होते.

घटनेनंतर काही काळासाठी लेणी क्र. २६ कडे पर्यटकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली. जखमी पर्यटकांवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने तत्काळ प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान, ६ एप्रिल रोजी लेणी क्र. १० समोरील मधमाशांच्या पोळ्यांचे यशस्वी स्थलांतर केल्यानंतर हल्ल्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. प्रशासनाकडून पर्यटकांना वेळोवेळी सूचना देण्याबरोबरच महनी बी कॅपफ देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून लेणी क्र. ४ चा मुख्य प्रवेशद्वार तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून पर्यटकांना पर्यायी छोट्या मार्गाने प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील मधमाशा सध्या आक्रमक होत नसल्याचे दिसून येते. तथापि, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लेणी क्र. ४, ९, २५ व २६ समोरील उर्वरित पोळ्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पर्यटकांकडून जोर धरत आहे. सतत घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कायम स्वरूपी उपाययोजनेकडे दुर्लक्ष

गेल्या आठवड्यात इजा न पोहचवता भारतीय विभाग, वनविभाग तसेच तज्ञ पथकातील सदस्यांनी समन्वयाने काम करत लेणी क्रमांक ९ आणि १० जवळील पोळ्यांचेअत्यंत काळजीपूर्वक स्थलांतर करण्यात आले. लेणी परिसरात मधमाशा पोळ बनवून नयेत यासाठी पुरातत्व विभागाकडून ठोस पावले उचलल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यात मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला करून अनेकांना गंभीर जखमी केले आहे. यामुळे पर्यटकांमध्ये धास्ती पसरली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी पर्यटक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT