Sambhajinagar Bribe Case : होमगार्ड कार्यालयाच्या लिपिकाने फोनपेवर घेतली १५ हजारांची लाच File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Bribe Case : होमगार्ड कार्यालयाच्या लिपिकाने फोनपेवर घेतली १५ हजारांची लाच

उपचाराच्या खर्चाचे बिल व सानुग्रह अनुदान मंजूर करून देण्यासाठी २० हजारांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Home Guard office clerk took bribe of Rs 15,000 on PhonePe

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा होमगार्डचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर उपचाराच्या खर्चाचे बिल व सानुग्रह अनुदान मंजूर करून देण्यासाठी २० हजारांची मागणी करून १५ हजारांची लाच चक्क फोनपे वर स्वीकारणाऱ्या जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या प्रमुख लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक केली.

ही कारवाई एन-१२ भागातील होमगार्ड समादेशक कार्यालयात गुरुवारी (दि.३) दुपारी करण्यात आली. सोपान पंडितराव टेपले (४१, रा. मयूरपार्क) असे आरोपी लिपिकाचे नाव असल्याची माहिती एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी दिली.

तक्रारदार २४ वर्षीय तरुणीचे वडील हे जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांचे उपचारदरम्यान खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या उपचाराचे बिल व सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी तरुणीने कायदेशीर अर्ज केला होता. त्यानंतर तरुणी ही होमगार्ड समादेशक कार्यालयात फाईलची माहिती विचारण्यासाठी गेली. तेव्हा तिला टेपले यांनी २० हजारांची लाच मागितली. तरुणीला लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार केली.

बुधवारी तरुणीला टेपले यांच्याकडे पंचासोबत एसीबीच्या पथकाने पाठवून लाच मागणीची पडताळणी केली. त्यात २० हजारांची मागणी करून तडजोडअंती १५ हजार फोनपे वर पाठवायला सांगितले. तरुणीकडे फोनपेवर पैसे कमी असल्याने तिने उद्या पैसे पाठवते, असे सांगितले. गुरुवारी तरुणीने १५ हजार फोनपेवर टेप-लेला पाठवले. फोन करून पैसे आल्याची खात्री केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या कार्यलयातून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT