मराठा आरक्षण उपसमिती बैठक तात्काळ घ्या file photo
छत्रपती संभाजीनगर

मराठा आरक्षण उपसमिती बैठक तात्काळ घ्या

अन्यथा १८ एप्रिलपासून आंदोलन : मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

पुढारी वृत्तसेवा

Hold the Maratha Reservation Sub-committee meeting immediately.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची तातडीने बैठक घेण्यात यावी. अन्यथा १८ एप्रिलपासून क्रांती चौकातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारला देण्यात आला. याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना मराठा समन्वयक योगेश शेळके धामोरीकर, सुनील कोटकर, निलेश डव्हळे, प्रशांत पाटील, सोमनाथ मनाळ, विठ्ठल कुंजर यांनी निवेदन दिले आहे.

या निवेदनात उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या आठ दिवसांत छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत संवाद बैठक घ्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच हैदराबाद गॅझेटच्या आधारे जातप्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत असलेल्या त्रुटी दूर करून सुस्पष्टता जाहीर करावी, अशी मागणी तर मराठा समाजाला आरक्षणाबाबत सातत्याने आश्वासने देऊन प्रत्यक्षात काहीच मिळाले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला. आर-क्षणाचे कायदे न्यायालयात टिकले नसल्याने समाजात असंतोष वाढला आहे. तसेच सारथी संस्थेच्या योजनांमध्ये कपात, शिष्यवृत्ती व प्रशिक्षणातील अडथळे, तसेच आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जावरील व्याज परताव्यात होणारा विलंब यामुळे विद्यार्थी व व्यावसायिक अडचणीत आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेणे, मृतांच्या कुटुंबांना मदत व नोकरी देणे, तसेच पारदर्शक आकडेवारी जाहीर करणे या मागण्यांवरही भर देण्यात आला. दरम्यान, आठ दिवसांत बैठक न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देत संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे मराठा क्रांती मोचनि स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT