Marathwada heavy rain : मराठवाड्यात हाहाकार; पिके सपाट, नुकसान अफाट File Photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada heavy rain : मराठवाड्यात हाहाकार; पिके सपाट, नुकसान अफाट

अतिवृष्टीमुळे चार दिवसांत १२३९ गावे बाधित, सव्वादोन लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

Heavy rains in Marathwada flatten crops, damage immense, 1239 villages affected in four days due to heavy rains

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा परतीच्या पावसाने मराठवाडयात प्रचंड धुमाकूळ घातला. गेल्या चारच दिवसांत मराठवाड्यात आणखी २ लाख २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान हिंगोली, बीड, लातूर, भागशिय आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. परभणी, जालना आणि नांदेड जिल्ह्यांतील नुकसानीची आकडेवारी मात्र निरंक दाखविण्यात आली आहे. चार दिवसांत तब्बल १२२९ गाऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे.

मराठयात्यात यंदा जून महिन्यापासूनच सतत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. दररोज सेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी होऊन शेती रिकांचे नुकसान होत आहे. विशेषतः जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वेळोवेळी अतिवृष्टी होऊन सुमारे १६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातच नदिय, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिवसह सर्वच जिल्हाांना पावसाने झोडपले असून, शेकडो गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीच्या आकडा २२ लाख हेक्टरपर्यंत पोहोचला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, २० सप्टेंबरपासून २४ सप्टेंवरपर्यंतच्या चार दिवसांत हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि छारपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२३९ गावे माथित झाली आहेत. या गावांमधील सुमारे २ ला ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, यात बीड जिल्ह्यात ७८ हजार, धाराशिव जिल्ह्यात ६२ हजार, लातूर जिल्ह्यात ४८ हजार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० हजार आणि हिंगोली जिल्ह्यात साडेनऊ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.

चार दिवसांत दहा जणांचा मृत्यू

२० सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या चार दिवसांत मराठवाड्यात पावसामुळे तब्बल १० जणांना जीव गमवावा लागला आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी तीन जणांचा, धाराशिव जिल्ह्यात दोघांचा आणि छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. तर लहान मोठी ३३७ जनाबरे मृत्युमुखी पडली आहेत.

२० तलाव फुटले, १३९३ घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सार्वजनिक आणि खासगी मालमतेचे मोठे नुकसान झाले आहे, मराठवाडयात एकूण २० तलाव फुटले आहेत. एकट्या धाराशिव जिल्ह्यात १५ आणि जालना जिल्ह्यात ५ तलाव फुटले आहेत. यासोबतच मराठयाश्यात १३ रस्त्यांचे नुकसान झाले आहे. ६ ठिकाणचे पूल वाहून गेले आहेत. २ शाळांची पडझना झाली आहे.

उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौ-यावर

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांचा दौरा निक्षित केला आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या कर्जाचा हवाला देत, पूरग्रस्तांसाती केंद्र सरकारने तातडीने २०,००० कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी केली आहे. भाराशिनचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेतकयांसाठी प्रति हेक्टर ५०,००० रुपये मदत जाहीर करण्याची आणि कर्जमाफी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोलापूरसह लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून नियम शिथिल करून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. फडणवीस यांनी एकही शेतकरी मदतीविना राहणार नाही अशी ग्वाही देत प्रशासनाला नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादा करण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करुन पूरग्रस्तांशी संवाद साधला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 'एकही एकर पंचनाम्याविना राहू नये' असे आदेश दिले.

अजित पवारांना मुंगशी गावातील शेतकऱ्यांनी घातला गराडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील आणि प्रशासनाला कटक शब्दात सूचना केल्या. अजित पवार हे मुंगळी गावात पाहणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी नुक्रमान्सग्रस्त शेतकयांसह गावातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांच्या गराया अजित पवार पूरपरिस्थिताया आढावा घेत होते अन् माध्यमांना माहिती देत होते. यावेळी गावकऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे आपल्या भावना आणि व्यथा मांडल्या. अजित पवार यांनी यावेळी त्यांचे खरोखरच नुकसान झाले आहे त्यांनाच मदत मिळणार, असे स्पष्टपणे सांगितले.

अतिवृष्टीग्रस्त भागातील पुलांची तात्काळ दुरुस्ती करा : अजित पवार

भूम, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पडलेले, खचलेले किंवा वाहून गेलेले सर्व पूल तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करताना त्यांनी सांगितले की, "सेतकरी मोठ्या संकटात आहे. शासन व प्रशासन त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त व पूरग्रस्तांनी धीर सोडू नये, तत्काळ मदत करण्यावर शासनाचा भर आहे." उपमुख्यमंत्री पवार यांनी वालवड येथे फुटलेल्या दोन तलावांमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच सोलापूरनगर मार्गावरील पाठसांगवी गावाजवळ पूल वाहून गेल्याने, त्या पुलावर आणखी दोन गाळे वाढविण्याच्या सूचना संभाजीनगर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या माचबरोबर, नद्या-नाल्यांमुळे गाळाने बुजलेल्या किंवा पडलेल्या विहिरीचा प्रश्न सोडवण्यासाठी गाळ काढणे अथवा नवीन विहिरींना निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या. शेती खरदून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून तत्काळ मदत वितरित करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तालुक्यातील अनेक गावे गेल्या ४८ तासांपासून अंधारात असल्याचे लक्षात घेऊन, वीज वितरण कंपनीने कर्मचारी वाढवून पुरग्रस्त भागातील कामे तातडीने पूर्ण करण्याचेही आदेश त्यांनी दिले. यानंतर सुबळी गोरमाळा येथे फुटलेल्या पाझर तलावामुळे झालेल्या सेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच बालवड येथील फुटलेले दोन तलाव व पाटसांगवीतील तलावाची पाहणीही त्यांनी केली. अजित पवार मांनी तहसीलदार जयवंत पाटील यांना तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पिकांचे, जमिनीचे, विहिरीचे, पशुधनाचे तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याचे नुकसानभरपाईसाठी कोणालाही वगळले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात आमदार सिक्रम काळे, राष्ट्रलादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे, माजी जि.प. सदस्य मधु मोटे, रणजित मोटे, संजय पाटील आरखोलिकर, विजय बोराडे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

महाजन यांनी घेतल्या भेटी

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत्त शेतकयांशी संवाद साधला. तेरणा नदीला पूर आल्याने अनेक गावांमध्ये शेती पाण्याखाली गेली आहे. सोयाबीन, मूग, उडीद आणि ऊस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. धाराशिव तालुक्यातील बोरखेडा, बोरगाव राजे, कनगरा टाकळी, पाडोळी (आ), बेंबळी, घुता, चिखली, कामेगांव, सांगवी आणि समुद्रवाणी या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने घरांचेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीत मदतकार्याला वेग देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मंत्री महाजन आणि आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT